(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘बिग बॉस’ १८ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून, चाहत्यांमध्ये या शोची चर्चा सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी टीव्हीवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी, बॉलीवूड, टीव्ही कलाकारांपासून ते वकील आणि राजकारण्यांपर्यंत सर्वजण या शोमध्ये स्पर्धक म्हणू दिसत आहेत, या सगळ्यांनी पहिल्या आठवड्यापासून घरातील वातावरण तापवले आहे. यासोबतच शोचा पहिला वीकेंड वार देखील आला आहे. याच वीकेंडवारचे प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. नुकतेच बिग बॉस 18 चा पहिला नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. यावेळी करण वीर मेहरा, अविनाश मिश्रा, मुस्कान बामणे, चाहत पांडे आणि गुणरत्न सदावर्ते हे सगळे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते.
बिग बॉस 18 चे झाले पहिले नॉमिनेशन
यावेळी बिग बॉसमध्ये खूप भांडण पाहायला मिळाली आहेत. सीझनच्या पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांनी शोचे तापमान वाढवले. मनोरंजनाची कमतरता कमी पडली नाही. गुणरत्न सदावर्ते आपल्या विचित्र बोलण्याने प्रेक्षकांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे मनोरंजन करताना दिसला. दरम्यान, बिग बॉसमधील एका स्पर्धकाचा प्रवासही संपला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या सदस्याला घराबाहेर काढण्यात आले आहे तो सदस्य नॉमिनेटेड नव्हता. जाणून घेऊयात कोणता सदस्य घर बाहेर गेला आहे.
या सदस्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे
बिग बॉस 18 मधून बाहेर पडलेल्या पहिल्या स्पर्धकाचे नाव खूपच धक्कादायक आहे. बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलेला पहिला सदस्य ‘गधराज’ असल्याचे सांगण्यात येत आहे. होय, बिग बॉस 18 मधून गधराजचा प्रवास संपला आहे. शोच्या प्रीमियरला गधराजने इतर स्पर्धकांसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता, पण आता ही गधराज शोमध्ये दिसणार नाही. यामुळे सोशल मीडिया यूजर्सही मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.