फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉसच्या घरामधे टाइम गॉडचा यास्क झाला आणि यामध्ये कोण नवा टाइम गॉड होणार यासाठी तीन स्पर्धक निवडण्यात आले आहेत. या टास्कमध्ये इशा सिंह, करणवीर मेहरा, दिग्विजय राठी असे स्पर्धकांचे वाद पाहायला मिळाले. आता या टास्कदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामध्ये ईशा सिंहला बिग बॉसचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.
टास्कदरम्यान ईशा आणि करणवीर मेहरा यांच्यात वाद झाला. करणकडे पाहून ईशा त्याला इथे येऊन बसायला सांगते (तिच्या पायाजवळ इशारा करून). यावर करणवीर म्हणतो की, मी तिकडे येईन पण तू मला परत बोलशील की चिप माणूस म्हणून. यावर ती म्हणते करणला की, तू चिप माणूस आहेस. यावर करण म्हणतो की, म्हणूनच तुझी हास्य खूप सुंदर आहे तू तिकडे लक्ष्य दे ना माझ्याकडे कशाला लक्ष्य देतेस.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टास्क झाल्यानंतर ईशा सिंह हे रजत आणि अविनाशला हे तिघे बसलेले असतात, तेव्हा ती त्यांना सांगते की, जर मी तुझ्या इथे आलो तर मी तुझ्यासोबत चिप होईल. यावर आता चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. याच घटनेवर आता अभिनेत्री काम्या पंजाबीने ईशाच्या या कृतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा ईशा अविनाश आणि रजतला या संभाषणाबद्दल सांगते तेव्हा ती म्हणते की त्यावेळी करणने मला त्याच्याजवळ येऊन बसायला सांगितले, तर मी त्याला म्हणाली की, तू खूप चिप आहेस. ईशाचे म्हणणे ऐकून रजत आणि अविनाश करणवीरवर रागावले. आता काम्याने या घटनेशी संबंधित एक ट्विट केले आहे. काम्या पंजाबीने ट्विट केले आणि लिहिले – अरे, ईशा, असे खोटे… तेही नॅशनल टीव्हीवर. काम्याच्या या ट्विटवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Arre Arre Eisha itna jhooth…woh bhi National Television pe 😃 #BiggBoss18 @ColorsTV
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) November 27, 2024
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कमेंट करताना एका यूजरने लिहिले- ईशाचे खोटे ऐकल्यानंतर नॅशनल टीव्हीही म्हणेल प्लीज म्यूट करा. आणखी एका यूजरने लिहिले की, या खोट्याने करणवीरची प्रतिमा डागाळली जात आहे, मला आशा आहे की ईशाची ही क्लिप कुटुंबातील सर्व सदस्यांना दाखवली जाईल. कमेंट करताना तिसऱ्या यूजरने काम्या पंजाबीला सांगितले की, कृपया वीकेंडला या आणि लाडला आणि लाडलीला रिॲलिटी चेक द्या. या कृतीमुळे ईशाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले की, कल्पना करा की अशा महिला कॅमेऱ्यांशिवाय काय करतील पुरुषांबद्दल वाईट वाटते.