फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉस १८ खेळ दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. दिवसेंदिवस नवनवे सरप्राईझ बिग बॉस घरच्या सदस्यांना देत आहेत. या आठवड्यामध्ये अनेक मोठे वाद पाहायला मिळाले आहेत. यामध्ये कालच्या भागामध्ये करणवीर मेहरा आणि सारा खान या दोघांमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला आणि साराने या वादामध्ये करणवीर मेहराच्या अंगावर पाणी टाकले. तर दुसरीकडे श्रुतिका अर्जुन आणि चुम दारंग यांच्यामध्ये मैत्रीमध्ये तडा जाताना दिसली. या दोघींमध्ये मोठा ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. करणवीर मेहरा आणि सारा खान यांच्या वादामध्ये करण साराला म्हणाला की, मला माहिती आहे की तू हे सगळे का करत आहेस. या आठवड्यामध्ये नॉमिनेट झाली आहेस म्हणून तू हे सगळं करत आहेस.
बिग बॉसने या आठवड्यात नात्यांची परीक्षा घेतली आणि यामध्ये या आठवड्यामध्ये सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये आता करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, कशिश कपूर, श्रुतिका अर्जुन, तेजिंदर बग्गा आणि सारा खान हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. आता याचसंदर्भात वोटिंगची रँकिंग समोर आली आहे यावर एकदा नजर टाका.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘बिग बॉस’ची बातमी देणारे सोशल मीडिया बिग बॉस खबरी या अकाउंटवर वोटिंग ट्रेंड शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर सोशल मीडियावर चर्चित असलेला स्पर्धक करणवीर मेहरा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विवियन डिसेना आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे अविनाश मिश्रा आणि कशिश कपूर हे दोघे आहेत. पाचव्या क्रमांकावर तमिळ अभिनेत्री श्रुतिका अर्जुन आहे. शेवटच्या दोन स्थानी म्हणजेच सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे तेजिंदर बग्गा आणि सारा खान हे दोघे आहेत. त्यामुळे या दोघांचे घराबाहेर जाण्याचे चान्स जास्त आहेत. त्यामुळे आता विकेंडच्या वॉरला कोणाला घराबाहेर काढले जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल.
Exclusive
Current Voting trends
1) #KaranveerMehra
2) #VivianDsena
3) #AvinashMishra
4) #KashishKapoor
5) #ShrutikaArjun
6) #TajinderBagga
7) #SaraArfeenKhanKaranveer becomes the user’s first choice, Sara and Bagga are in bottom… #BiggBoss18 #Bb18 #BiggBoss
— Biggboss Khabri (@BiggbossKaTadka) November 27, 2024
‘बिग बॉस’ची बातमी देणारे सोशल मीडिया पेज ‘ग्लॅम वर्ल्ड टॉक्स’च्या रिपोर्टनुसार, ईशा सिंह, ईडन रोज आणि विवियन डिसेना यांनी टाइम गॉड बनण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता. आता या तिघांमध्ये ईशाने टास्क जिंकला आणि घराची नवीन टाइम गॉड झाली आहे. ईशा टाइम गॉड झाल्यामुळे काही लोक खूश आहेत. काही लोक दु:खीही असतात. एकाने लिहिले की, ‘गेमच्या या टप्प्यावर ईशाला टाइम गॉड बनवायला नको होती.’ दुसऱ्याने लिहिले, ‘ईशाचा स्वतःचा कोणताही खेळ नाही. टाइम गॉड बनून ती काय करणार? तिसऱ्याने लिहिले, ‘अविनाशने ईशाला पहिल्या नामांकनातून वाचवले आणि आता तिला टाइम गॉड बनवले. एवढं कुणासाठीही करू नये. टाईम गॉड झाल्यानंतर ईशा अविनाशला फसवण्याची शक्यता आहे.