फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध रिऍलिटी शो बिग बॉस 18 खूप चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना खुप वाद आणि बरेच नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. शोबाबत नवनवीन अपडेट्सही प्रत्येक क्षणी समोर येत आहेत. मागील आठवड्यामध्ये सलमान खान उपस्थित नव्हता. मागच्या वेळेप्रमाणे या शुक्रवारची वार देखील यावेळी रवी किशनने होस्ट केला. आता सलमान खान शोमध्ये पुनरागमन करणार आहे आणि एवढेच नाही तर यावेळचा वीकेंड वॉर खूपच स्फोटक असणार आहे. सलमान खान पुन्हा कुटुंबीयांसाठी क्लास घेण्यासाठी येत आहे. अशा परिस्थितीत आता वीकेंड का वार प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान बिग बॉसच्या घरामधील स्पर्धकांवर रंगवताना दिसणार आहे.
बिग बॉस 18 संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बिग बॉस 18 चा वीकेंड वॉर खूप खास असणार आहे. एकच नाही तर अनेक पाहुणे त्यांच्या उपस्थितीने शोमध्ये येणार आहेत. तर दुसरीकडे घरातील अनेक स्पर्धक यावेळी सलमान खानच्या रागाचे बळी ठरणार आहेत. पण या सगळ्यात सलमानने दिग्विजय सिंह राठी आणि अविनाश मिश्रा यांचा क्लास घेतला. शोच्या ताज्या प्रोमोमध्ये सलमान म्हणतो, ‘अविनाश आणि दिग्विजय, जीन्स फाड.’ यावर दिग्विजय म्हणतो की जीन्स फाटत नाहीये सर. हे ऐकून सलमान म्हणतो की तुमच्याकडून जीन्स फाटत नाही आहे. तुमच्या दोघांकडून एक जीन्स फाटत नाहीये आणि तुम्ही दोघे एकमेकांना मधून फाडण्याबद्दल बोलत आहेत, दिग्विजय, तू बाहेर किती माणसे फाडली आहेस.
#WeekendKaVaar Promo – Salman bash Digvijay and Avinash. Ashneer Grover ko kuch yaad dilaya bhai nepic.twitter.com/YOukqCDaTZ
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 15, 2024
यानंतर सलमान खान म्हणतो की, अविनाश आणि दिग्विजय, तुम्हा दोघांना एकमेकांची काय अडचण आहे. या घरात दिसण्यासाठी शत्रुत्व दाखवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे असे दिसते. अविनाश चुकीचा आहे, जर तुझा हेतू शिल्पाला सपोर्ट करण्याचा एवढाच बरोबर होता तर तू प्रत्येक गोष्टीवर व्हॅलिडेशन का मागत होतास. यावेळी सलमान खान कोणालाच सोडणार नसल्याचे या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे.
‘बिग बॉस 18’ च्या ‘वीकेंड का वार’शी संबंधित अपडेट समोर आली आहे, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमान खानने ‘वीकेंड का वार’चे शूटिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात ‘फ्रायडे का वार’मध्ये रवी किशन त्याचा शो ‘हाय दैया विथ रवी भैया’ होस्ट करताना दिसला. तर सलमान खान कुटुंबातील सदस्यांसाठी शनिवार आणि रविवारी शाळा घेईल. या आठवड्यात डॉली चायवाला बिग बॉसमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून प्रवेश करणार आहे. इतकेच नाही तर विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना देखील त्यांच्या ‘द साबरमती रिपोर्ट्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर येणार आहेत.