(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रिॲलिटी शो बिग बॉस १९ सुरू झाल्यापासून, असा एकही दिवस गेला नाही की स्पर्धकांमध्ये वाद झाला नाही. पण आता हा वाद हातापाई पर्यंत गेला आहे. शोच्या आगामी प्रोमोमध्ये अभिषेक बजाज आणि अमाल मलिक यांच्यात भांडण होताना दिसले आहेत. इतर स्पर्धक आता अडचणीत अडकले आहे. या मोठ्या भांडणामुळे आता ‘बिग बॉस’ मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत.
Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?
अभिषेकने अमालवर केली टीका
शोच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, अशनूर कौर इतर स्पर्धकांसोबत टास्क खेळताना दिसत आहे. अशनूरने सर्वांना प्रोत्साहित केले. दरम्यान, अभिषेक म्हणाला, “अमाला, तुला हे समजले असेल, कारण तू खूप भुंकतोस.” यावर अमाला रागावला आणि म्हणाला, “तुला जे करायचे आहे ते कर.” त्यानंतर अभिषेकने अमालला ढकलले, ज्यामुळे दोघांमध्ये भांडण होताना दिसले आहे.
घरातील सदस्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला
अभिषेकच्या या वक्तव्यावर अमालने प्रत्युत्तर देत म्हटले, “मी आधीच सांगितले आहे, तू माझं का वाकडं करू शकत नाहीस” त्यानंतर अभिषेक आणखीनच आक्रमक झाला आणि म्हणाला, “मी करून दाखवेल.” यामुळे दोघांमध्ये हातामाई होताना दिसली आहे. त्यांच्यात भांडण झालं आणि जोरदार वाद झाला. इतर स्पर्धकांनी या दोघांचा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत.
शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!
वीकेंड का वारमध्ये काय घडणार?
या भांडणाचा निकाल काय असेल आणि वीकेंड का वारमध्ये काय गोंधळ होणार? हे शोच्या आगामी भागांमध्येच प्रेक्षकांना दिसणार आहे. सलमान खानच्या रागाचे लक्ष्य कोण असेल हे देखील काळानुसार उघड होणार आहे. सलमान खानच्या शोमध्ये स्पर्धकांमध्ये अशा प्रकारचे वाद किंवा हाणामारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. खरंच, मागील सीझनमध्येही अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत.