Bobby Deol
‘आश्रम’ या वेब सीरिजनंतर अभिनेता बॉबी देओलने ‘लव्ह हॉस्टेल’ आणि ‘ॲनिमल’ या चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांसाठी खूप प्रशंसा मिळवली. बॉबीला सिनेमातली खलनायकाची पात्रं खूप आवडतात. आणि ते पात्र तो अत्यंत हुशारीने पार पडतो. बॉबीची खलनायकाची भूमिका आता प्रेक्षकांना जास्त पसंतीस आली आहे.
बॉबी देओल याआधीच साऊथ मधील दोन चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. आता ‘ज्युनियर एनटीआर’ आणि सैफ अली खान अभिनीत देवरा: पार्ट वन या चित्रपटात त्याची एंट्री झाल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. या चित्रपटातून सैफ आणि अभिनेत्री जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना दिसली आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ देखील खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे.
दुसरा खलनायक म्हणून बॉबीची एंट्री दिसणार
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात बॉबीची एंट्री दुसऱ्या खलनायकाच्या भूमिकेत होणार आहे. दोन भागात बनत असलेल्या देवरा या पहिल्या भागात बाबीची भूमिका छोटी असणार आहे. दुसऱ्या भागात तो सैफच्या भूमिकेच्या समांतर मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक कोरतला सिवा यांनी बॉबीशी याबाबत चर्चा केली असून बॉबीनेही या चित्रपटाला होकार दिला आहे. आता या चित्रपटामधील त्याची भूमिका पाहणे चाहत्यांसाठी उत्कंठाकाची बाब ठरली आहे.
हे देखील वाचा- Khel Khel Mein चे ‘हौली हौली’ गाणं रिलीज, अक्षय कुमारचा नवा लूक पाहून चाहते थक्क!
तसेच, देवरा या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्री जान्हवी कपूरची कोणतीही भूमिका पाहायला मिळणार नाही आहे परंतु या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ती पाहायला मिळणार असून तिच्या भूमिकेमुळे कथेला एक मनोरंजक ट्विस्ट मिळणार आहे. RRR नंतर, Jr NTR चा हा दुसरा चित्रपट आहे जो संपूर्ण भारत स्तरावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.