Hauli hauli song out
सरफिरा रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘खेल खेल में’ या चित्रपटाची तयारी करत आहे. तसेच या चित्रपटातील ‘हौली हौली’ हे सॉंग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे या गाण्याचा ट्रक चांगला वाजत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, एमी विर्कसोबत तापसी पन्नू आणि आदित्य सीलसोबत प्रज्ञा जैस्वाल यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘हौली हौली’ हे गाणं एखाद्या पार्टी गाण्यासारखे तयार करण्यात आले आहे एखाद्या कार्यक्रमादरम्यान चित्रित केले गेले असावे असे या दृश्यात दिसून येत आहे. दरम्यान, सर्व सेलेब्स एथनिक ड्रेसमध्ये चमकताना दिसत आहेत. या गाण्यात अक्षय कुमारचा सॉल्ट एंड पेपर लुक प्रेक्षकांना पाहायला मिळाला असून तो चाहत्यांना भलताच आवडला आहे.
या गाण्याचा शेअर केला बीटीएस व्हिडीओ
याआधी, गाण्याच्या रिलीजची घोषणा करण्यासाठी, अक्षय कुमारने एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो गाणे वाजल्यानंतर मध्येच अचानक नागिन डान्स करायला लागतो. हा व्हिडीओला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या सगळ्यावरून स्पष्ट होते कि चित्रपट पाहताना चाहत्यांना वेगळीच मज्जा येणार आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘मेहनत, स्मितहास्य… आणि संपूर्ण युनिटचे प्रेम. मी हे सर्व गोळा करून तुमच्या हाती देत आहे. लवकरच येत आहे. ट्रेलरच्या आधी गाणे प्ले करा. सायंकाळी ५ वाजता ‘हौली हौली’ हे गाणं तुमच्या भेटीला येत आहे. असे लिहून त्याने चाहत्यांना या गाण्याच्या संदेश दिला.
हे देखील वाचा- काजोलचा क्वीन ऑफ क्वीन्समध्ये दिसणार नवा अवतार, ‘महारागानी’ होणार लवकरच प्रदर्शित!
‘हौली हौली’ गाणं कोणी गायले?
या गाण्यामध्ये पंजाबी मजेदार ट्रॅक आहे जो गुरु रंधावा, यो यो हनी सिंग आणि नेहा कक्कर या तिघांनी मिळून हे गाणं गायले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘खेल खेल में ‘ आता येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूरच्या स्त्री 2 सोबत टक्कर होणार आहे. आणि या दोन्ही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.