Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon MX Player वर उलगडणार विस्मृतीत गेलेल्या प्रेमाची आणि दुसऱ्या संधीची कथा Campus Beats Return, ट्रेलर रिलीज

अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने, तब्बल पाच सीझन मिळवलेल्या अफाट प्रेमाच्या जोरावर, आज कॅम्पस बीट्स रिटर्न्सचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 04:57 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅम्पस बीट्स रिटर्न्सचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित
  • प्रेमाचा नवीन पदर उलगडताना
Campus Beats Return : अॅमेझॉन एमएक्स प्लेयर, भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेने, तब्बल पाच सीझन मिळवलेल्या अफाट प्रेमाच्या जोरावर, आज कॅम्पस बीट्स रिटर्न्सचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित केला. बनिजय एशियाने निर्मित केलेली ही मालिका पल्की मल्होत्राने लिहिली असून सर्जनशीलरित्या रचली आहे. तसेच अनिरुद्ध राजदेरकर यांनी ती दिग्दर्शित केली आहे. या कलाकृतीत शांतनु माहेश्वरी, श्रुती सिन्हा, सहज सिंग चहल, दीपांकना दास, अदनान अहमद यांच्यासोबत पारस कलनावत, चाँदनी शर्मा आणि सुवंश धर अशा कलाकारांचा समावेश आहे. नाट्यमयता आणि भावना या दोन्हींवर भर देत, चाहत्यांची आवडती फ्रँचायझी अधिक दिलदार, नाट्य- नृत्याने बहरलेला धमाकेदार आणि अविस्मरणीय अनुभव देणार आहे. परंतु यावेळी, केवळ कथनाच्या ओघाने कथा पुढे जाणार नसून ती पूर्णपणे डोक्यात घोंगावत राहील.

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाचा नवीन पदर उलगडताना

प्रेमाचा नवीन पदर उलगडताना ट्रेलरमध्ये इशान आणि नेत्राच्या प्रवासातील भावनिक वळण पाहायला मिळते. एकीकडे त्यांचे प्रेम फुलायला लागते मात्र नियतीच्या कल्पना निराळ्या असतात. नेत्रा एक नवीन जीवन सुरू करताना दिसते आणि सुमेरच्या रुपाने तिला नवीन प्रेम लाभते. तिला परत आपल्या जीवनात आणण्याचा निर्धार करून, इशान तिचा पाठलाग करतो. परंतु गोष्टी पूर्वीसारख्या सोप्या राहत नाहीत, नवीन समीकरणे तयार होऊ लागतात. जे उलगडते ते प्रेम, गोंधळ आणि बदलत्या बंधांचे मिश्रण! जिथे भूतकाळ दफन होण्यास तयार नसतो.

हा सीझन कथेची पकड घट्ट करतो

हाय-व्होल्टेज डान्स फेस-ऑफ, स्लो-बर्न स्पर्धा आणि पार्श्वभूमीत बंदिस्त होण्यास नकार देणारे एक रहस्य, हा सीझन केवळ अपेक्षा वाढवणारा नाही तर कथेची पकड घट्ट करतो. रहस्ये गळून पडू लागतात, निष्ठा पूर्वीसारखी टिकत नाहीत आणि ओळखी अस्पष्ट होऊ लागतात. ज्यामुळे कथा प्रेम आणि रहस्यमयतेच्या गर्तेत ओढली जाते. सर्व गोंधळ आणि निर्विवाद केमिस्ट्रीमध्ये, एक प्रश्न शांतपणे डोकं वर काढतोः नेत्राला आयुष्यात परत आणण्यासाठी इशानचे प्रेम पुरेसे ठरेल का?

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य

अॅमेझॉन एमएक्स प्लेअरचे हेड ऑफ कंटेंट, अमोघ दुसाद यांनी सांगितले, “कॅम्पस बीट्स ही आमच्यासाठी तरुण प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली आणि सर्वाधिक काळ सुरू असलेली फ्रँचायझी आहे. या नव्या पर्वात आम्ही भावनांची अधिक सखोलता, जोशपूर्ण नृत्य आणि आत्ताच्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे अनपेक्षित वळण यांचा सुरेख मेळ साधत आमच्या सादरीकरणाच्या कक्षा आणखी विस्तारल्या आहेत. हा नवीन सीझन प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि तो प्रेक्षकांना अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येईल.”

या सिझनमध्ये इशानचा प्रवास अधिक अंतर्मुख

नवीन सिझनबद्दल बोलताना शांतनु माहेश्वरी म्हणाले, “नृत्य माझ्या मनाच्या खूप जवळचं आहे, आणि कॅम्पस बीट्स मुळे मला गेल्या काही वर्षांत ते साजरं करण्याची एक हक्काची जागा दिली आहे. या सिझनमध्ये इशानचा प्रवास अधिक अंतर्मुख आहे. तो एका अशा गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, जी दुसऱ्या व्यक्तीसाठी आता अस्तित्वातच नाही. ही असमतोल परिस्थिती सगळंच बदलून टाकते त्याची झुंज बाहेरून शांत वाटते, पण आतून ती अधिक तीव्र बनते.”

श्रुती सिन्हा म्हणाल्या, “कॅम्पस बीट्सच्या सहाव्या सिझनसह अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर परतताना खूपच छान वाटत आहे. या सिझनमध्ये नेत्राचा प्रवास स्वतःला नव्याने शोधण्याचा आहे, पण तो सरळ किंवा सहजसाध्य नाही. तिच्या मनात संभ्रम आहे, अंतर्मनाचे संकेत आहेत आणि काही अशा अपूर्ण जाणिवा आहेत ज्या ती पूर्णपणे समजू शकत नाही. यावेळी मला या पात्राकडे अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागलं. ते आव्हानात्मक होतंच, पण त्याचबरोबर खूप रोमांचकही होतं.”

या सिझनमध्ये फ्रँचायझीत सहभागी झालेल्या पारस कलनावत यांनी सांगितले, “कॅम्पस बीट्ससारख्या लोकप्रिय युवा फ्रँचायझीचा भाग होण्याचा अनुभव खरोखरच विलक्षण आहे. या शोची भव्यता, कथानक मांडण्याची शैली आणि त्यातील एनर्जी या सगळ्यालाच तोड नाही. या सिझनचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे, आणि प्रेक्षकांनी तो अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहावा, याची मला आतुरता आहे.”

स्पर्धा तीव्र होत असताना, प्रेम फुलत असताना आणि रहस्ये उलगडण्यासाठी तयार असताना, कॅम्पस बीट्स रिटर्न्सचा प्रीमियर 29 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. ही सिरीज केवळ अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर विनामूल्य प्रसारित केली जाईल, जी मोबाइल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओ टीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीमवर उपलब्ध असेल.

Tula Pahata : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे ‘तुला पाहता’ चित्रपटातून कमबॅक; तीन पिढ्यांची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांसमोर

Web Title: Campus beats returns trailer out shantanu maheshwari shruti sinha head into a new chapter of love and conflict see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • amazon prime video

संबंधित बातम्या

Amazon MX Player : Campus Beats Returns चा ट्रेलर प्रदर्शित! २९ एप्रिलपासून मोफत Streaming
1

Amazon MX Player : Campus Beats Returns चा ट्रेलर प्रदर्शित! २९ एप्रिलपासून मोफत Streaming

Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक
2

Amazon Now चा विस्तार होणार दुप्पट! अवघ्या काही मिनिटांत डिलिव्हरी देण्यासाठी सज्ज; तब्ब्ल 2800 कोटींची गुंतवणूक

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
3

स्वप्न, ताकद आणि जगण्यासाठीची झुंज! प्राइम व्हिडिओच्या ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नव्या सीझनचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
4

हॉटेलमध्ये धुवावी लागली होती प्लेट आणि… जातीवादामुळे धक्कादायक वागणूक, ‘पंचायत’ सीरीजच्या अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.