(फोटो - सोशल मीडिया)
सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. सोशल मीडियावर एक भव्य पोस्टर शेअर केला आहे. 5 जून 2026 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे: “शाही आगमनासाठी तारीख निश्चित झाली असं म्हणत लक्षात ठेवा – “संशय हा एक शैतान आहे” असं सांगितलं आहे. आणि या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. ‘राव बहादुर’चा टीझर एक अनोखी कथा सादर करतो, जिथे नायकावर एका शैतानाची छाया आहे आणि इथे ‘संशय’ हाच सर्वात मोठा शैतान आहे. हा चित्रपट रहस्यमय वास्तववाद म्हणजेच mystical realism मध्ये गुंफलेला एक सायकोलॉजिकल ड्रामा म्हणून उभा राहतो.
दमदार निर्माते, दूरदर्शी दिग्दर्शक आणि आपल्या निर्भीड अभिनयासाठी ओळखला जाणारा मुख्य अभिनेता यांच्या जोरावर ‘राव बहादुर’ हा येणाऱ्या काळातील सर्वात प्रतिक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांच्या ‘GMB एंटरटेनमेंट’कडून सादर केला जाणारा ‘राव बहादुर’ हा प्रशंसित दिग्दर्शक वेंकटेश महा यांचा पुढील चित्रपट आहे. त्यांनी यापूर्वी ‘C/o कांचरपालम’ आणि ‘उमा महेश्वर उग्र रूपस्य’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटाची निर्मिती तेलुगू सिनेमातील दोन यशस्वी बॅनर्स ‘A+S मूवीज’ आणि ‘श्रीचक्रा एंटरटेनमेंट’ यांनी केली आहे. ‘A+S मूवीज’ने याआधी GMB एंटरटेनमेंटसोबत सुपरहिट ‘मेजर’ चित्रपट केला होता, तर ‘श्रीचक्रा एंटरटेनमेंट’ने समीक्षकांनी गौरवलेला ‘KA’ चित्रपट साकारला होता. हा चित्रपट समर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.






