(फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
‘छावा’ चित्रपटातील हे गाणे काही काळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. ज्याचे शीर्षक ‘जाने तू’ असे ठेवण्यात आले आहे. प्रसिद्ध बॉलिवूड गायक अरिजित सिंग यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘जाने तू’ ला आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच या गाण्याला चाहत्यांचा काय प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहेत.
ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, ७ दिवसात काढून घेतलं महामंडलेश्वर पद!
‘छावा’ चित्रपटातील स्टार कास्ट
खरंतर, ‘छावा’ हे शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत अक्षय खन्ना देखील दिसणार आहेत. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदान्ना महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजेच महाराणी येसूबाईची भूमिका साकारत आहे. अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आशुतोष राणा सर सेनापती हंबीराव मोहिते यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दिव्या दत्ता सोयराबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि डायना पेंटी झीनत-उन-निसा बेगम औरंगजेब मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
इंस्टाग्राम शेअर केली पोस्ट
इंस्टाग्रामवर, निर्मात्यांनी चित्रपटातील गाण्याची एक झलक शेअर केली आणि एक नोट देखील लिहिली. छावाचे पहिले गाणे ‘जाने तू’ इंस्टाग्रामवर रिलीज झाले आणि त्यासोबत निर्मात्यांनी नोटमध्ये लिहिले की, “काही बंध काळाच्या पलीकडे, शब्दांच्या पलीकडे असतात, जे इतिहासात कायमचे कोरले जातात.” तसेच त्यांनी असेही लिहिले की हे गाणे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी येसूबाई यांना आदरांजली आहे. असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
‘डब्बा कार्टेल’चा टीझर प्रदर्शित; साई ताम्हणकर, ज्योतिकासह शबाना आझमी दिसणार मुख्य भूमिकेत!
चित्रपट छावा होणार या दिवशी प्रदर्शित
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाचा साउंडट्रॅक अल्बम ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केला आहे तर गीते इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात तसेच रशियामध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अक्षय खन्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.