फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस सिझन १८ : सध्या बिग बॉस मराठीचा कहर सुरु आहे, लवकर होस्ट सलमान खानचा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे, या कार्यक्रमामध्ये मोठे मोठे कलाकार फेमसाठी या शोमध्ये येत असतात. त्यामुळे आता या शोमध्ये कोणते कोणते स्पर्धक असणार आहेत असा चर्चा आता सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. बिग बॉस हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो आहे, ज्याची प्रचंड क्रेझ आहे. बिग बॉस ओटीटी ३ संपल्यापासून बिग बॉस १८ हेडलाइन बनत आहे. शो सुरू व्हायला अजून काही वेळ आहे, पण स्पर्धकांची चर्चा जोरात सुरू आहे. आता शोमधील मोठी अपडेट समोर आली आहे.
हेदेखील वाचा – Bigg Boss Marathi : रितेश देशमुख देणार आज निक्की तांबोळीला धक्का! दिली सर्वात मोठी शिक्षा
बिग बॉस १८ च्या पुष्टी झालेल्या स्पर्धकांची नावे निर्मात्यांनी अद्याप उघड केलेली नाहीत, परंतु अनेक स्टार्स या शोमध्ये सामील झाल्याच्या बातम्या आहेत. आता यामध्ये एका प्रसिद्ध कॉमेडियनचेही नाव जोडले गेले आहे, ज्याने वर्षानुवर्षे द कपिल शर्मा शोमध्ये राहून प्रेक्षकांना हसवले आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, द कपिल शर्मा शोच्या चंदू चायवाला उर्फ चंदन प्रभाकरबद्दल. बिग बॉसशी संबंधित माहिती देणाऱ्या एका इंस्टाग्राम पेजनुसार, चंदू सलमान खानच्या शोमध्ये येणार आहे. तो या शोमध्ये पक्का स्पर्धक आहे. तथापि, अद्याप कॉमेडियन किंवा निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही.
चंदन प्रभाकर याने कपिल शर्मामध्ये १० हून अधिक वर्ष काम केले आहे. त्याच्या खास अंदाजामुळे त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. कुंडली भाग्य फेम धीरज धूपर, चाहत पांडे, स्प्लिट्सविला फेम जान खान, अनिता हसनंदानी, सुधांशू पांडे, शाहीर शेख, सुरभी ज्योती यांसारखे स्टार्स बिग बॉसच्या 18 व्या सीझनमध्ये दिसू शकतात.