(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी धक्कादायक बाबी सातत्याने समोर येत आहेत. सुनील पाल यांनी 2 डिसेंबर रोजी त्यांचे दिल्ली विमानतळावरून अपहरण केल्याचा आरोप केला होता. यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्यांना मेरठला नेले. जिथे अभिनेत्याला त्यांनी २४ तास एका खोलीत ओलीस ठेवले होते. त्याच्या कागदपत्रांवरून आठ लाख रुपयांची खंडणी ऑनलाइन वसूल करण्यात आली. नंतर त्याची सुटका झाली. आता याचदरम्यान चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये तो मेरठच्या ज्वेलर्सकडून सोने खरेदी करताना दिसत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित ज्वेलर्सची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
सुनील पाल यांच्या म्हणण्यानुसार, एका कार्यक्रमाच्या बहाण्याने त्यांना हरिद्वारला बोलावण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यांना पत्नीने फोन केला होता, मात्र फोन उचलला नाही म्हणून पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यासाठी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात आली. आणि आता यानंतर दोन सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. पहिले फुटेज मेरठच्या सदर बाजारातील एका दुकानाचे आहे. ज्यामध्ये 2 लोक 4 लाख रुपयांचे दागिने खरेदी करताना दिसत आहेत. नंतर दोन्ही आरोपी लाल कुर्ती बाजारातील एका दुकानात जातात. तेथून 2.25 लाख रुपयांचे दागिने खरेदी केले आहे. आणि यावेळी सुनील पाल यांच्या नावाने ज्वेलर्सकडून बिलही काढले गेले आहे.
कॉमेडियन सुनील पाल का अपहरण करने वालों ने मेरठ, यूपी के शोरूम से ज्वैलरी खरीदी। बाकायदा इसका बिल भी सुनील पाल के नाम से बनवाया। CCTV में बैठे दोनों शख्स किडनेपर्स हैं। मुंबई पुलिस ने ज्वैलर्स का अकाउंट फ्रीज कराया।
सुनील पाल को किडनेपर्स ने फर्जी ईवेंट बताकर मुंबई से बुलाया और… https://t.co/U7anFcVuBx pic.twitter.com/uhHZRUNDiN
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 9, 2024
फहद फासिल ‘पुष्पा ३’ मध्ये नसणार? अखेर, अभिनेता चित्रपटाच्या तिसऱ्या भागापासून का झाला दूर?
पोलिसांकडून सुरक्षा घेतली नाही
मुंबई पोलिसांनी दोन्ही ज्वेलर्सची खाती गोठवली आहेत. टाइम्स नावच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सुनील पाल यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले होते. मात्र पाल यांनी नकार दिला. पाल यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस दर 3-4 तासांनी त्याला फोन करून त्याची तब्येत विचारत आहेत. मुलांना भीती वाटू नये म्हणून सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही. तो स्वत: 3-4 वेळा पोलिस ठाण्यात गेला आहे. अपहरणकर्त्यांनी त्याचा संपूर्ण मोबाईल डेटा ट्रान्सफर केला होता. पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांचे नंबर त्यांनी घेतले होते.