(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
आदिवी शेषच्या आगामी ‘डकैत’ चित्रपटात मृणाल ठाकूरच्या एन्ट्रीनंतर आता अनुराग कश्यपने चित्रपटात एन्ट्री केली आहे आणि त्याच्या व्यक्तिरेखेचाही खुलासा झाला आहे. या चित्रपटात अनुराग स्वामी नावाच्या एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्याला या भूमिकेत पाहण्यासाठी आता चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कंगना आणि जावेद अख्तरमध्ये समेट; ५ वर्षांनी दिसले एकत्र, अभिनेत्रीने फोटो शेअर करून केले कौतुक!
‘डकैत’ मध्ये अनुराग कश्यपची एन्ट्री
चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटातील आणखी एका नवीन पात्राचा पहिला लूक रिलीज केला आहे, जो बॉलीवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यप साकारणार आहे. या चित्रपटात अनुराग इन्स्पेक्टर स्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. इन्स्पेक्टर स्वामीचा फर्स्ट लूक शेअर करताना, निर्मात्यांनी पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे. चाहते आता या पोस्टरला भरभरून कंमेंट करत आहेत.
Deeksha lo unna Police Nannu pattukuntadu ata..
Nannu pattukovalante aa Devude Digi ravali emo 💥
Delighted to have the Amazing @anuragkashyap72 sir in #DACOIT.@mrunal0801 @Deonidas #BheemsCeciroleo @danushbhaskar @abburiravi @KrishSiddipalli @srinagendrapd @KalyanKodati… pic.twitter.com/y33VA50QYv
— Adivi Sesh (@AdiviSesh) February 28, 2025
अनुरागचा पहिला तेलुगू चित्रपट ‘डकैत’
अनुराग कश्यप ‘डकैत’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक ते अभिनेता अनुराग कश्यप यांनी यापूर्वी तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापूर्वी, डकैतच्या कलाकारांमध्ये मोठा बदल झाला होता जेव्हा श्रुती हासनने काही कारणास्तव मुख्य अभिनेत्री म्हणून या प्रकल्पातून माघार घेतली आणि श्रुतीच्या जागी मृणाल ठाकूरला साइन करण्यात आले. या बातमीने चाहते चांगलेच चकित झाले. परंतु आता अनुराग कश्यपला पाहून चाहते उत्साहित झाले आहेत.
“अ परफेक्ट मर्डर”चा होणार महिलांसाठी विशेष प्रयोग, जाणून घ्या कधी आणि कुठे रंगणार ?
चित्रपटाचे पहिले पोस्टर
१७ डिसेंबर २०२४ रोजी, डकैतच्या निर्मात्यांनी आदिवीच्या वाढदिवसासोबत मृणाल ठाकूरचा पहिला लूक रिलीज केला. या पोस्टरमध्ये मृणालच्या कपाळावर जखम आहे आणि ती गाडीत बसलेली दिसत आहे आणि तिच्या हातात बंदूक दिसत आहे. या पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आमच्या दरोडेखोर आदिवी शेषला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याच्या खास दिवशी, आम्ही त्याला विश्वासघात करणाऱ्याची ओळख करून देतो. त्याचे प्रेम. त्याचा शत्रू. मृणाल ठाकूरचे चित्रपटात स्वागत आहे.” असे लिहून त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले.