Singham Again
रोहित शेट्टीने बॉलीवूडला कॉप ब्रह्मांडची झलक प्रेक्षकांपर्येन्त पोहचवली आहे. सिंघम, सिम्बा, सूर्यवंशी या चित्रपटामधून भारतीय पोलीस दल चा दर्जा वाढवला आहे. अलीकडेच तुम्ही शिल्पा शेट्टीला सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर इंडियन पोलिस फोर्समध्ये पोलिस अवतारात पाहिले असेल. या मालिकेत शेनेता तिवारीही दिसली होती.
आता यानंतर, येत्या काळात तुम्हाला दीपिका पदुकोण देखील या पोलीस विश्वाचा एक भाग बनताना दिसणार आहे. सिंघम अगेनमध्ये दीपिका एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या धमाकेदार चित्रपटात दीपिका पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या पात्राचे नाव शक्ती शेट्टी असणार आहे.
रोहित शेट्टीने सांगितली चित्रपटाची योजना
ही उत्कंठा इथेच संपणार नाही तर, रोहित शेट्टी लवकरच महिला पोलीस विश्वात आणण्याची योजना आखत आहे. रोहित शेट्टीने न्यूज 18 शो शोला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केली. रोहित म्हणाला की त्याला महिला-केंद्रित पोलीस विश्वावर आधारित चित्रपट बनवायचा आहे आणि तो लवकरच बनवला जाणार आहे.
प्रेक्षकांना चित्रपट आवडेल
याशिवाय रोहितने त्याच्या आगामी सिंघम या चित्रपटाबद्दलही सांगितले. रोहित म्हणाला की तो VFX पेक्षा वास्तविक ॲक्शन सीक्वेन्सवर विश्वास ठेवतो आणि प्रेक्षकांना या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे असे त्याने या मुलाखतीत उघड केले. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण यांसारखे कलाकार सिंघम अगेनमध्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात श्वेता तिवारी एका इंटेलिजन्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिंघम अगेन हा अजय देवगण स्टारर सिंघम फ्रँचायझीचा तिसरा आणि रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. सिंघम या चित्रपटाचा पहिला भाग २०११ मध्ये आला होता. यानंतर 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स आला. आणि आता हा ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.