(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता आणि दिग्दर्शक अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अलिकडेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा चित्रपट पाहिला आहे. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हा चित्रपट मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते अनुपम खेर यांचे अभिनंदन केले.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पहिला ‘तन्वी द ग्रेट’
‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट १८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एका विशेष प्रदर्शनातून हा चित्रपट पहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथेबद्दल आनंद व्यक्त केला. दिल्ली सरकारने हा चित्रपट मुलांना दाखवावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
हा चित्रपट सरकार दाखवेल का?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, ‘चित्रपटाची थीम खरंच खूप चांगली आहे. देशातील आणि जगातील प्रत्येक मुलाने हा चित्रपट पाहणे महत्वाचे आहे. दिल्ली सरकारच्या वतीने, मी हा चित्रपट जास्तीत जास्त मुलांना दाखवू इच्छिते. हा चित्रपट हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहे.’ असे त्यानी म्हटले आहे.
मुख्यमंत्री रेखा यांनी अनुपम खेर यांचे अभिनंदन केले
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अनुपम खेर आणि त्यांच्या टीमचे चित्रपटाद्वारे एक खास थीम दाखवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, ‘हा चित्रपट मुलांच्या भावनांशी जोडला जातो जे जग पाहू शकत नाही. या थीमवर चित्रपट बनवल्याबद्दल मी अनुपम खेर यांचे अभिनंदन करते. त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करते. या चित्रपटाच्या यशाबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन.’ असे म्हणून त्यांनी या चित्रपटाच्या टीमचे आणि अनुपम यांचे कौतुक केले.
या चित्रपटाचे जगभरात कौतुक झाले
‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटात शुभांगी दत्तची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिच्यासोबत जॅकी श्रॉफ, बोमन इराणी आणि करण ठक्कर हे देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात ऑटिझमने ग्रस्त असलेल्या एका मुलीची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट कान्स आणि न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये या चित्रपटाला उभे राहून दाद मिळाली आहे.