shoaib ibrahim shares wife dipika kakar health update on post surgery developed mild ulcers
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या हेल्थमुळे कमालीची चर्चेत आहे. मे २०२५ मध्ये अभिनेत्रीला यकृताच्या कॅन्सरचे निदान झाले होते. तिला दुसऱ्या स्टेजच्या यकृताच्या कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर अभिनेत्रीला डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. अभिनेत्रीवर गेल्या महिन्यातच डॉक्टरांनी तब्बल १४ तासांची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी ट्यूमर देखील काढून टाकला आहे. त्यानंतर आता दीपिका कक्कर कर्करोगमुक्त झाली असून शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती तिच्या घरी सुद्धा परतली आहे.
कायमच, सोशल मीडियावर दीपिकाचा पती शोएब इब्राहिम युट्यूब ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या पत्नीची हेल्थ अपडेट शेअर करत असतो. अशातच, शोएबने दीपिकाची हेल्थ अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली. पुन्हा एकदा अभिनेत्रीची तब्येत बिघडली. काही तासांपूर्वीच शोएबने युट्यूबवर एक नवीन ब्लॉग शेअर केला आहे. शेअर केलेल्या ह्या ब्लॉगमध्ये, शोएबने दीपिकाची हेल्थ अपडेट दिली आहे, “दीपिकाची टार्गेटेड थेरपी आजपासून सुरू झाली आहे. त्या थेरपीचा आज पहिला दिवस आहे, आता तिला बरं वाटत आहे. पण, दुसऱ्या दिवशी दीपिकाला काही त्रास झाला. तिच्या तोंडात फोड आले आहेत.”
ब्लॉगमध्ये शोएब पुढे म्हणाला की, “थेरपीनंतर दीपिकाने सांगितले की, तिला खूप थकवा जाणवत आहे. पण काही फरक पडत नाही. ती रुहानबरोबर बाहेर गेली होती. कदाचित म्हणूनच तिला थकवा जाणवत असेल.” तोंडाला फोड आल्याबद्दल दीपिका म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितले होते की, अल्सर होऊ शकतात. त्यासाठी शक्य तितके पाणी प्यावे लागेल. म्हणून मी माझे पाण्याचे सेवन वाढवले. मला वाटते की, ते ठीक होईल.”
यापूर्वी तिच्या ब्लॉगमध्ये दीपिका म्हणाली की, “शस्त्रक्रियेनंतर, माझे संपूर्ण आयुष्यच बदलले आहे. पूर्वी मी एका जागी बसू शकत नव्हते, मी काहीतरी काम तरी करत राहायचे. पण आता मला कोणतेही काम करायचे नाही. अर्थात, डॉक्टरांनी मला सक्रिय राहण्याचा सल्ला दिला आहे, परंतु असे दिवस येतात जेव्हा मला वाटते की मला फक्त विश्रांती घ्यावी लागेल आणि बाकी काहीही नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली की, डॉक्टरांनी माझ्यावर भविष्यात कशापद्धतीने उपचार केले जाणार ? याबद्दलही ठरले आहे. टार्गेट थेरपी नावाचे एक औषध आहे, जे मी पुढील आठवड्यापासून सुरू करेन. ओरल टार्गेट थेरपी दरम्यान, मला एक गोळी घ्यावी लागते. मी फक्त प्रार्थना करते की माझे शरीर आतापर्यंत करत असलेल्या उपचारांप्रमाणेच भविष्यातही ते सहन करू शकेल. प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम असतात आणि मला खात्री आहे की याचेही दुष्परिणाम होतील. मी फक्त प्रार्थना करत आहे आणि माझा विश्वास ठेवत आहे.