(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहिद धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर चाहते त्याच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
शाहिद ‘देवा’ म्हणून चमकणार
संपूर्ण ट्रेलरमध्ये शाहिद कपूर धमाकेदार अॅक्शन आणि त्याच्या इंटेन्स लूकमध्ये दिसला. संपूर्ण ट्रेलरमध्ये अभिनेता वर्चस्व गाजवतो. तो शहरातून गुंडांना संपवताना दिसतो. ट्रेलरमध्ये गुंड आणि देवा यांच्यातील जोरदार लढाई दाखवण्यात आली आहे, जी चाहत्यांची उत्सुकता वाढवणार आहे. पोलिसाच्या भूमिकेत हा अभिनेता खूपच छान दिसतो आहे. तसेच अभिनेता बऱ्याच काळानंतर एका अॅक्शन चित्रपटात दिसला आहे. ‘मी एक माफिया आहे…’ हा संवाद बोलताना अभिनेता जबरदस्त दिसत आहे.
Azaad Review: अजय देवगणचा हा चित्रपट करेल तुम्हाला भावुक; राशा थडानी-अमन देवगणने जबरदस्त पदार्पण!
‘भसड़ मचा’ गाण्यावरील नृत्यासह ट्रेलर प्रदर्शित
ट्रेलर लाँच कार्यक्रमात चित्रपटातील ‘भसड़ मचा’ या गाण्यावरील सादरीकरणासह ते प्रदर्शित करण्यात आले. या कार्यक्रमाला शाहिद कपूर आणि पूजा हेगडे उपस्थित होते. निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट स्टोरीवर ट्रेलर लाँच इव्हेंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित चित्रपट ३१ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहिदचे चाहते त्याला बऱ्याच दिवसांपासून अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी उत्सुक होते. आता अखेर अभिनेत्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला
नुकताच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. ५ जानेवारी २०२५ रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला. या छोट्या क्लिपमध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. शाहिदचा डान्स आणि त्याचा इंटेन्स लूक नेटकऱ्यांना खूप आवडला. चित्रपटातील ‘भसड़ मचा’ हे गाणेही चाहत्यांना खूप आवडले. तसेच आता चित्रपट पाहण्यासाठो चाहते खूप उत्सुक आहेत. ‘देवा’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, शाहिद व्यतिरिक्त, या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारत आहे आणि तिच्यासोबत पावेल गुलाटी, प्रवेश राणा आणि कुब्रा सैत यांचाही समावेश आहे.