(फोटो सौजन्य - अकाउंट)
‘रांझणा’ या चित्रपटाद्वारे प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करणारा दाक्षिणात्य अभिनेता धनुष त्याच्या आगामी अनेक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, त्याच्या ‘तेरे इश्क में’ चित्रपटाची एक झलक सर्व चाहत्यांना पाहायला मिळाली. आता धनुषने सोशल मीडियावर त्याच्या आणखी एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे आणि त्याची एक झलक पाहताच चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
धनुषने त्याच्या आगामी ‘D56’ चित्रपटाबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, एक अनेक वर्षे जुनी तलवार दिसते, ज्यावर एका सांगाड्याची कवटी जोडलेली आहे. हे पोस्टर पाहायला खूप भितीदायक दिसते आहे. हा फोटो शेअर करताना लिहिले की, एका मोठ्या युद्धाची सुरुवात. हा चित्रपट मारी सेल्वराजचा चित्रपट आहे.
धनुषच्या चाहत्यांना D56 थीम पोस्टर खूप आवडला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘मी या चित्रपटाची वाट पाहत आहे’, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘ऑल द बेस्ट धनुष’, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘पाहायला मजा येणार आहे.’ असे कंमेंट करून अनेक चाहत्यांनी याला प्रतिसाद दिला आहे. तसेच या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
#D56 Roots begin a Great War
A @mari_selvaraj film pic.twitter.com/3yfhd6B2pZ— Dhanush (@dhanushkraja) April 9, 2025
D56 या नावावरूनच हे स्पष्ट होते की हा धनुषचा 56 वा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मारी सेल्वराज करणार आहेत. निर्मात्यांनी थीम पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. D56 हा एक ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा चित्रपट असेल. या प्रकल्पाची निर्मिती वेल्स फिल्म इंटरनॅशनल करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आता चर्चेत आहे.
D56 व्यतिरिक्त, धनुष चित्रपट निर्माते शेखर कम्मुला दिग्दर्शित ‘कुबेरा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट जून २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी धनुषचे आणखी दोन चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत, ज्यात ‘इडली कडाई’ आणि ‘तेरे इश्क में’ यांचा समावेश आहे. ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात धनुषसोबत कृती सेनन दिसणार आहे.