
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
धर्मेंद्र यांच्या निधनाचे दुःख आपल्या हृदयात इतके खोलवर रुजले आहे की त्यांचे नाव घेतले तरी आपल्या डोळ्यात अश्रू येतात. कदाचित या अभिनेत्याचा प्रत्येक चाहता या अवस्थेत असेल. २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्या दिवशी त्यांचे कुटुंब आणि चाहते शोकात बुडाले. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी स्वतः सांगितले की, त्यांनी त्यांचा शेवटचा चित्रपट “इक्कीस” पाहण्यास देखील मिळाला नाही. “इक्कीस” आता २५ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. दरम्यान, चाहत्यांना भावूक करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये धर्मेंद्र सर्वांची माफी मागताना दिसले आहेत आणि म्हणाले आहेत, “जर मी काही चूक केली असेल तर मला माफ करा.”
‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल
धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ “इक्कीस” च्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा आहे. त्या दिवशी सेटवर धर्मेंद्र भावुक होताना दिसले आहेत आणि त्यांनी चित्रपटाच्या टीम आणि चाहत्यांसाठी त्यांचा शेवटचा संदेश रेकॉर्ड केला. परंतु, त्यांना तेव्हा कल्पना नव्हती की तो संदेश प्रत्यक्षात त्यांचा शेवटचा संदेश ठरणार आहे आणि चित्रपट पाहण्यासाठी ते या जगात जिवंत राहणार नाहीत. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत.
धर्मेंद्र यांचा शेवटच्या व्हिडीओने केले भावुक
मॅडॉक फिल्म्सने नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात धर्मेंद्र यांनी असे म्हटले आहे की, “मॅडॉक फिल्म्ससोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. टीम आणि कॅप्टन श्रीराम (राघवन) अद्भुत आहेत. हा चित्रपट सुंदरपणे बनवला गेला आहे. मला वाटते की भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातील लोकांनी तो पाहावा.” धर्मेंद्र पुढे म्हणाले, “मी आनंदी आणि दुःखी दोन्ही आहे कारण आज सेटवरील माझा शेवटचा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना खूप प्रेम करतो. जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा.” धर्मेंद्रचे चाहते या व्हिडिओने भावूक झाले. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
चाहत्यांनी भावुक होऊन दिली प्रतिक्रिया
व्हिडीओ पाहून एका चाहत्याने लिहिले, “आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल, धरम जी. तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.” दुसऱ्याने कमेंट केली, “आम्ही तुमच्या आठवणींसाठी ‘इक्कीस’ पाहू, धरम जी.” दुसऱ्याने म्हटले, ‘इक्कीस’ चित्रपट आम्हाला नेहमीच तुमची आठवण करून देईल, धरम जी.” दुसऱ्याने म्हटले, “धरम जी, तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहाल.” असे लिहून अनेक चाहत्यांनी आपले मत मांडले आहे.
“इक्कीस” मध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत आहेत, जे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते. या चित्रपटात जयदीप अहलावत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि हा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.