Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र! ‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्त्रीमनाची नवी मांडणी

मराठी इंडस्ट्रीमधील दोन उत्तम अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि मुक्त बर्वे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा ही नात्यांवर अवलंबून असून, नवी मांडणी दाखवणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 30, 2026 | 03:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • रोहिणी हट्टंगडी – मुक्ता बर्वे पुन्हा एकत्र
  • ‘माया’मध्ये अनुभवायला मिळणार स्त्रीमनाची नवी मांडणी
  • ‘माया’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी रंगभूमीवर माय लेकीचं नातं अत्यंत संवेदनशीलतेनं मांडणाऱ्या गाजलेल्या ‘चारचौघी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे या दोन दिग्गज अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. यावेळी त्या रंगभूमीवर नव्हे, तर मोठ्या पडद्यावर ‘माया’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘चारचौघी’सारख्या स्त्रीप्रधान नाटकानंतर आता ‘माया’ या चित्रपटातही या दोघी स्वतंत्र विचारांच्या, स्वाभिमानी आणि आत्मभान असलेल्या स्त्री व्यक्तिरेखा साकारणार आहेत. अनुभव आणि अभिनयातील परिपक्वतेचा संगम असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारी ठरत आहे. रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय म्हणजे सूक्ष्मतेतून मोठे भाव उलगडणारी प्रक्रिया आहे, तर मुक्ता बर्वे ही आधुनिक स्त्रीचं सशक्त प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘माया’ मध्ये त्यांचा केवळ अभिनय नाही तर, स्त्रीमनाच्या विविध छटांची प्रगल्भ मांडणी पाहायला मिळणार आहे.

KING: १० दिवस अन् ५० कोटी रुपयांचा खर्च; निर्मात्यांनी शाहरुख खानच्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्सवर घालवला पाण्यासारखा पैसा

याबद्दल सांगताना अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, ”मुक्तासोबत पुन्हा काम करणं हा एक अत्यंत समाधान देणारा अनुभव आहे. ती एक संवेदनशील, विचारशील आणि स्वतःच्या अभिनयाबाबत प्रचंड प्रामाणिक अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना समोरची व्यक्तिरेखा अधिक सखोल होते. अभिनय म्हणजे केवळ संवाद बोलणं नसून, तो जगण्याचा अनुभव असतो आणि मुक्ताकडे तो अनुभव मनापासून स्वीकारण्याची क्षमता आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक सीन मला अभिनेत्री म्हणून अधिक समृद्ध करून जातो.”

मुक्ता बर्वेने आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले, ”रोहिणी ताईंसोबत पुन्हा काम करणं, ही माझ्यासाठी शिकण्याचीच एक प्रक्रिया आहे. त्यांच्या अनुभवातून येणारी शांतता, प्रसंग समजून घेण्याची दृष्टी आणि अभिनयातील प्रगल्भता सतत प्रेरणा देते. सेटवर त्यांच्यासोबत असताना अभिनय सहज घडतो. त्यांनी आयुष्य आणि अभिनय दोन्ही खूप खोलवर अनुभवलं आहे आणि ते त्यांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतं. अशा कलाकारासोबत काम करणं हे खरं तर भाग्य आहे.”

After OLC’या’ तारखेला होणार प्रदर्शित; थरार आणि ॲक्शनने भरलेली कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित ‘माया’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर आणि विजय केंकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणारा ‘माया’ हा चित्रपट त्याच्या पोस्टरमुळे आधीच चर्चेत असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी, स्त्रीमनाच्या स्वातंत्र्याची आणि आत्मशोधाची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: After charchaughi drama rohini hattanadi and mukta barve played role with together in maya marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले
1

Chandrapur News: टाकीचे बांधकाम पूर्ण, मात्र पाणी मिळेना! मासाळा तुकुमला पाण्याची प्रतीक्षा, ग्रामस्थ संतापले

KING: १० दिवस अन् ५० कोटी रुपयांचा खर्च; निर्मात्यांनी शाहरुख खानच्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्सवर घालवला पाण्यासारखा पैसा
2

KING: १० दिवस अन् ५० कोटी रुपयांचा खर्च; निर्मात्यांनी शाहरुख खानच्या एका अ‍ॅक्शन सीक्वेन्सवर घालवला पाण्यासारखा पैसा

After OLC’या’ तारखेला होणार प्रदर्शित; थरार आणि ॲक्शनने भरलेली कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3

After OLC’या’ तारखेला होणार प्रदर्शित; थरार आणि ॲक्शनने भरलेली कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mardaani 3 Review: राणी मुखर्जीच्या दहशतीने घाबरले लोक, ‘अम्मा’ च्या अभिनयाने वेधले लक्ष; प्रेक्षकांच्या समोर आल्या प्रतिक्रिया
4

Mardaani 3 Review: राणी मुखर्जीच्या दहशतीने घाबरले लोक, ‘अम्मा’ च्या अभिनयाने वेधले लक्ष; प्रेक्षकांच्या समोर आल्या प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.