(फोटो सौजन्य-Social Media)
आदित्य चोप्राची सर्वात मोठी फ्रेंचाइजी धूमची क्रेझ आजही कायम आहे. पहिल्या ते तिसऱ्या या फ्रँचायझीचे आतापर्यंत तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. 11 वर्षांनंतर या चित्रपटाचा चौथा भाग येत असून, सर्वत्र आत ‘धूम 4’ची चर्चा आहे. धूम 4 साठी आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत. धूम 4 मध्ये आधी रणवीर सिंग, नंतर शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांचे नाव मुख्य भूमिकेत येत होते. मात्र, या तिघांपैकी कोणीही आदित्य चोप्राच्या चित्रपटात दिसणार नाही आहे.
हा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार
धूम 4 साठी आदित्य चोप्राला त्याचा मुख्य नायक सापडला आहे. यावेळी आमिर खान किंवा हृतिक रोशन किंवा जॉन अब्राहम नसून बी-टाऊनचा रोमँटिक हिरो सर्वात मोठा चोर म्हणून समोर येईल. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर धूम 4 चा मुख्य नायक असणार आहे. रिपोर्टनुसार, रणबीर कपूरची निर्मात्यांशी चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. धूम 4 बद्दल चर्चा सुरू झाल्यापासून, रणबीर या फ्रँचायझीचा एक भाग होण्यास उत्सुक होता. धूमचा वारसा फक्त रणबीरच पुढे नेऊ शकतो, असे आदित्यला वाटते.
दोन अभिनेते होते मुख्यभूमीकेत
धूम फ्रँचायझीच्या तिन्ही चित्रपटांमध्ये खलनायक बदलत राहिला, पण अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा या दोन नायकांची जागा कोणीही घेऊ शकले नाही. तथापि, धूम 4 मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार नाही. फ्रँचायझीच्या चौथ्या चित्रपटात अभिषेक आणि उदय यांच्याऐवजी युवा पिढीतील दोन मोठे स्टार्स एसीपी जय आणि अली यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पात्रांसाठी अद्याप कोणताही स्टार निश्चित झालेला नाही. परंतु या चित्रपटाचा हिरो मात्र निश्चित झाला आहे.
हे देखील वाचा- ‘फुक्रे 3’ चित्रपटाला एक वर्ष पूर्ण, पुलकित सम्राटने मजेदार BTS सह शेअर केल्या आठवणी!
धूम 4 चे शूटिंग कधी सुरु होणार
आदित्य चोप्रा 2025 च्या उत्तरार्धात किंवा 2026 च्या सुरुवातीला धूम 4 चित्रपटाचे शूटिंग सुरू करू शकतो. नितेश तिवारीचा पौराणिक चित्रपट रामायण आणि संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर रणबीर कपूर धूम 4 मध्ये आपले सर्वस्व देईल. हा चित्रपट लावरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.