
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“बिग बॉस ओटीटी २” या रिअॅलिटी शोमध्ये दिसलेला अभिषेक मल्हानने पुन्हा एकदा जिया शंकरसोबत नाते जोडल्याचे समजले. सोशल मीडियावर त्यांचे साखरपुडा झाल्याचे बातमी देखील समोर आली. परंतु, अभिनेत्रीने ३० डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते. फुकरा इंसानसोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या अफवा खोट्या आहेत आणि अनावश्यकपणे पसरवल्या जात आहेत. असे या फोटोमधून स्पष्ट झाले आहे.
‘अजून चेहरा रिव्हिल केला नाही, आणि…’, भारती सिंगचा मुलगा काजूचा Ai Photo व्हायरल, संतापली कॉमेडियन
जिया शंकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, तो माणूस तिच्या कपाळाचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे आणि अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लाल हृदयाचा इमोजी देखील ठेवला आहे. तिने लिहिले की, “चला २०२५ मध्ये खोट्या अफवांना सोडून देऊ.” याचा अर्थ असा की तिने अप्रत्यक्षपणे पुष्टी केली आहे, की अभिषेक मल्हानभोवतीच्या अफवा खोट्या आहेत. त्यांचा साखरपुडा झालेला नाही.
अभिषेक आणि जियाच्या साखरपुड्याबद्दलचे दावे
खरं तर, “टेली खजाना” नावाच्या एका पोर्टलने दावा केला होता की जिया आणि अभिषेकचा साखरपुडा झाला आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहेत. त्यात लिहिले होते की, “हे अधिकृत आहे. फुकरा इन्सान आणि जिया शंकर यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आहे आणि वृत्तांनुसार, ते साखरपुडा देखील करू शकतात.” याव्यतिरिक्त, या जोडप्याच्या साखरपुड्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. परंतु आता त्या सगळ्या खोट्या असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले आहे.
जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांची मैत्री तुटली
जिया शंकर आणि अभिषेक मल्हान ते दोघे “बिग बॉस ओटीटी २” मध्ये दिसले होते, जिथे ते चांगले मित्र होते. परंतु, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी एकमेकांना ब्लॉक केले. अभिनेत्रीने सांगितले की ती आणि अभिषेक फक्त मित्र होते. त्या पलीकडे त्यांचे कोणतेही नाते नव्हते. तिने युट्यूबरच्या चाहत्यांना फटकारले आणि त्यांना मर्यादेत राहण्यास आणि तिच्या आणि तिच्या आईबद्दल अपशब्द वापरण्यापासून दूर राहण्यास सांगितले. आता जियाचा हा मिस्ट्री मॅन नक्की कोण आहे याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.