Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pooja Bhatt : “आमिर आणि माझं नातं…” पर्सनल आयुष्यातील त्या गोष्टींमुळे अभिनेत्री चर्चेत! म्हणाली “आम्ही एकमेकांच्या प्रेमात…”

Dil Hai Ke Manta Nahin चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पूजा भट्ट आणि आमिर खान यांच्यात उत्तम केमिस्ट्री व आकर्षण होते, असा खुलासा पूजा भट्ट यांनी केला आहे. कॅमेरा सुरू असताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात असल्यासारखे वाटायचो, असे त्या म्हणाल्या. मात्र हे नाते कधीही खऱ्या आयुष्यातील प्रेमसंबंधात बदलले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 03:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या Dil Hai Ke Manta Nahin या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना अभिनेत्री पूजा भट्ट यांनी अभिनेता आमिर खानसोबतच्या नात्याबाबत एक मनोरंजक खुलासा केला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री आणि आकर्षण होते, मात्र ते नाते कधीही खऱ्या आयुष्यातील प्रेमसंबंधांपर्यंत पोहोचले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क

 

मुलाखतीत पूजा भट्ट म्हणाल्या, “Dil Hai Ke Manta Nahin च्या शूटिंगदरम्यान कॅमेरा सुरू असताना आम्ही अक्षरशः एकमेकांच्या प्रेमात होतो. आमची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडली होती.” दोघांमध्ये त्या काळात आकर्षण होते का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हसत उत्तर दिले, “हा प्रश्न आमिरलाच विचारायला हवा. मी आकर्षक होतेच ना? तो माझ्याकडे आकर्षित झाला असता तर त्यात आश्चर्य काय?”

तथापि, त्यांनी स्पष्ट केले की दोघांमधील ती भावना केवळ पडद्यापुरतीच मर्यादित राहिली. “आमच्यात एक स्पार्क नक्की होता, पण त्याचे कधीही गंभीर नात्यात रूपांतर झाले नाही,” असे त्या म्हणाल्या. यावेळी पूजा यांनी आमिर खानच्या परफेक्शनिस्ट स्वभावाबद्दलही भाष्य केले. “आमिर प्रत्येक गोष्टीची बारकाईने तयारी करतो. चित्रपटातील प्रत्येक गोष्टीत त्याला रस असतो. काहींना ते हस्तक्षेप वाटेल, पण त्यामागे त्याची कामाप्रती असलेली निष्ठा असते,” असे त्यांनी सांगितले.

सेटवरील अनेक आठवणींना उजाळा देताना पूजा म्हणाल्या की, आमिर अनेकदा पात्राच्या लूकपासून ते वेशभूषेपर्यंत सर्व गोष्टींबाबत प्रश्न विचारायचा. “तू इतक्या उंच टाचेच्या चपला का घातल्या आहेत? त्या पात्राला शोभत नाहीत,” असे तो नेहमी म्हणायचा, असे त्यांनी सांगितले.

Sonakshi Sinha च्या आलिशान घराला विदेशी अरबपती भाडेकरू, तब्बल ‘ऐवढ्या’ कोटींची डील, किंमत ऐकून व्हाल थक्क

 

चित्रपटातील आमिरची प्रसिद्ध टोपीदेखील चर्चेचा विषय ठरली. सुरुवातीला संपूर्ण टीमने त्या टोपीची खिल्ली उडवली होती. “आम्ही त्याला सांगितले होते की ही लहान मुलांची टोपी आहे. पण नंतर तीच टोपी प्रचंड लोकप्रिय झाली आणि बाजारात सर्वत्र दिसू लागली,” असे पूजा यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही टोपी आमिरने त्याचा पुतण्या इम्रान खान याच्याकडून घेतली होती. आमच्या मैत्रीचे वर्णन करताना पूजा म्हणाल्या, “आम्ही एकमेकांची सतत मस्करी करायचो. आमचे नाते अगदी ‘टॉम अँड जेरी’सारखे होते. तो नेहमीच बरोबर असायचा असे नाही आणि आम्ही त्याला ते सांगायलाही मागेपुढे पाहत नव्हतो.” दरम्यान, Dil Hai Ke Manta Nahin च्या काळात आमिर खान यांचा विवाह रीना दत्ता यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांनी किरण राव यांच्यासोबत संसार थाटला. सध्या आमिर खान यांचे नाव गौरी स्प्रॅट यांच्यासोबत जोडले जात आहे.

Web Title: Does pooja bhatt was in relationship with actor aamir khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • relationship

संबंधित बातम्या

Fanaa ला २० वर्षे पूर्ण! आजही कायम चित्रपटाची जादू; झूनीच्या भूमिकेसाठी काजोलचं नाव स्वतः Aamir Khan यांनी सुचवलं
1

Fanaa ला २० वर्षे पूर्ण! आजही कायम चित्रपटाची जादू; झूनीच्या भूमिकेसाठी काजोलचं नाव स्वतः Aamir Khan यांनी सुचवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.