(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच ती नवनवीन व्हिडिओ, पोस्ट करताना दिसते. आता सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे तिच्या वांद्रेतील घरामुळे, तिने मुंबईच्या पॉश वांद्रे पश्चिम परिसरातील आपला आलिशान फ्लॅट भाड्याने दिला आहे. कागदपत्रांनुसार, हा फ्लॅट कुवैती दूतावासाला लीव्ह अँड लायसन्स तत्त्वावर भाड्याने देण्यात आला आहे. कुवेतचे महावाणिज्यदूत इमाद अब्दुल अझीझ अल-खराज यांनी हे घर त्यांच्या कुटुंबियांना आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी भाड्याने घेतले आहे.
हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिम येथील ’81 ऑरेट ‘ नावाच्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आहे. कागदपत्रांनुसार, या अपार्टमेंटचे कार्पेट क्षेत्रफळ ४,३५० चौरस फूट असून, त्यात २७ चौरस फुटांच्या नोकरांच्या बाथरूमचा समावेश आहे. कागदपत्रांवरून असे दिसून येते की, हा व्यवहार २५ मे २०२६ रोजी ९६,००० रुपयांच्या मुद्रांक शुल्कासह आणि १,००० रुपयांच्या नोंदणी शुल्कासह नोंदणीकृत झाला होता.
दोन महिन्यांचे भाडे ₹१.६ दशलक्ष आहे, भाडेकराराची सुरुवात ७ जून २०२६ रोजी होईल आणि परवाना ६ जून २०२७ रोजी संपेल. अपार्टमेंटसोबत तीन पार्किंग स्लॉटदेखील भाड्याने देण्यात आले आहेत.
अलिशान घरात कोणत्या सुविधा आहेत?
या घरात जीम, लायब्ररी, मिटिंग रूम, दोन स्विमिंग पूल(एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी), चालण्याचा आणि जॉगिंगचा ट्रॅक, एक जेवणाचा हॉल, तीन गार्डन, एक योग स्टुडिओ, एक ओपन-स्काय फिटनेस सेंटर, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि एक क्लबहाऊस आहे. भाडेकरू या सुविधांचा वापर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय करू शकतात. मुंबईतील कुवैत दूतावास दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील केसी कॉलेजवळ आहे.
सोनाक्षीचा नवीन चित्रपट, ‘सिस्टम’, २२ मे रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटात सोनाक्षी पहिल्यांदाच एका वकिलाची भूमिका साकारत आहे. कथेनुसार, ती नेहा नावाच्या एका तरुण आणि उत्साही वकिलाची भूमिका साकारत आहे, जिला तिचे वडीलच त्यांच्या प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये भागीदार होण्यासाठी स्वतःची योग्यता सिद्ध करण्याचे आव्हान देतात. या चित्रपटात ज्योतिका आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. खऱ्या आयुष्यात करोडपती आणि पडद्यावर एक कणखर वकील म्हणून सोनाक्षीने साकारलेली भूमिका चाहत्यांना खूप आवडत आहे.






