(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माती फराह खान हिने अलीकडेच हरिद्वारमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली आश्रमाला भेट दिली. फराह खान तिच्या युट्यूब चॅनेलमुळं आता चांगलीच चर्चेत आली आहे. ती सिनेइंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींच्या घरी जाऊन व्लॉग करताना दिसते. ती त्यांच्यासोबतच्या गप्पा, गोष्टी, खास किस्से शेअर करत असते. तीने अलीकडेच रामदेव बाबा यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या भेटीत तिने बाबा रामदेव यांच्याशी गप्पा मारल्या. आणि तिथे दोघांनी काही आरोग्यदायी पारंपारिक पदार्थ बनवले.
यावेळी फराह खानने बाबा रामदेव यांच्या साधेपणाची तुलना सुपस्टार सलमान खानशी केल्याचं बघायला मिळालं. बाबा रामदेव यांनी फराह खानला ध्यान केंद्र, सुंदर कॉटेज आणि आध्यात्मिक विकासासाठी डिझाइन केलेल्या शांत जागा दाखवल्या. यावेळी बाबा रामदेव म्हणाले, आम्ही इतरांसाठी महल बांधलाय, पण स्वत:साठी एक छोटी खोली.
“प्रेमासाठी अजून तयार…!” युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटानंतर धनश्री वर्माची पहिली प्रतिक्रिया
यावर फराह खाननं बाबा रामदेव यांची तुलना सलमान खान सोबत केली ती म्हणाली की, “म्हणजे तुम्ही आणि सलमान खान एकसारखेच आहात, तो पण 1BHK मध्ये राहतो आणि बाकी सगळ्यांसाठी महाल बांधत असतो.” हे ऐकून बाबा रामदेव दिलखुलास हसले आणि त्यांनी सहमती दर्शवली, “होय, हे खरंच आहे.”
अखेर उत्सुकता संपली! ‘महती अष्टविनायकाची’ हे धमाकेदार गीत लवकरच होणार रिलीज
फराह खान आणि बाबा रामदेव यांची भेट ही एका कुकिंग व्लॉगसाठी होती, पण ही भेट केवळ किचनपुरती मर्यादित राहिली नाही. फराह खाननं बाबा रामदेव यांना गंमतीत बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला, ज्याला रामदेव बाबा यांनीही तितक्याच विनोदी अंदाजात उत्तर दिलं
फराह खानची कुकिंग व्लॉग सीरिज
फराह खाननं 2024 मध्ये तिची कुकिंग व्लॉग सीरिज सुरू केली, ज्यात ती प्रसिद्ध व्यक्तींच्या घरातील स्वयंपाकघरात तिचा कुक दिलीपसोबत विविध पदार्थ बनवताना दिसते.या दोघांमधील केमिस्ट्री आणि मजेदार संवादामुळं तिचं युट्यूब चॅनेल लोकप्रिय झालं आहे