(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या नात्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या दोघांनी अलीकडेच यांच्या घटस्फोटाची घोषणा केली होती, आणि आता घटस्फोटानंतर धनश्रीने पहिल्यांदाच तिच्या नवीन नातेसंबंधांबद्दल तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.धनश्री एका मुलाखतीत म्हणाली , ”सध्या मी प्रेमासाठी तयार नाही, सध्या मला या सगळ्यापासून दूर राहायचं आहे. मी माझ्या नात्यात खूप काही सहन केलं आहे.”
धनश्री सध्या ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोचा भाग आहे, आणि तिचे सह-स्पर्धक नयनदीप रक्षित आणि पवन सिंग यांच्याशी बोलताना तिने तिच्या डेटिंग लाईफबद्दल थोडी स्पष्टता दाखवली आहे. धनश्रीने नयनीदीप रक्षित आणि पवन सिंग यांच्याशी बोलताना सांगितलं की, तिने एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं, जिथे ती पिवळ्या फुलांच्या शेतात उभी होती, हातात फुलांचा गुच्छ होता. हा क्षण अगदी तिला‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातल्या सीनसारखा वाटला.
स्टार प्रवाहवर ‘नशीबवान’ मालिकेची जोरदार सुरुवात! प्रोमोच्या पहिल्याच भागात मोठा ट्वीस्ट
यावर नयनदीपने विचारले की तिच्या स्वप्नातही राज आहे का? धनश्री वर्माने उत्तर दिले की तिला तिच्या आयुष्यात कोणीही नको आहे कारण तिने तिच्या नात्यात खूप काही अनुभवले आहे. शिवाय, धनश्रीने असेही म्हटले की ती इंडस्ट्रीची सलमान खान असेल.
उपमुख्यमंत्र्यांच्या सिनेमाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपली! रिलीज आधीच झाला कोट्यवधींचा गल्ला!
‘राईज अॅण्ड फॉल’ पासून सिनेमापर्यंतचा प्रवास
धनश्री वर्मा ही सध्या ‘राईज अँड फॉल रिअॅलिटी शोचा भाग आहे. ती कोरिओग्राफर म्हणूनच नव्हे, तर आता ती अभिनेत्री म्हणूनही स्वतःचं स्थान निर्माण करत आहे. ती नुकतीच राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या आगामी चित्रपट ‘भूल चूक माफ’ मधील एका गाण्यात दिसली, ज्यात तिची उपस्थिती प्रेक्षकांना भावली आहे. धनश्रीने नुकतीच तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं असून, तिने सोशल मीडियावर सेटवरील काही खास फोटोही शेअर केले आहेत.