(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
डॉन 3 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अमिताभ बच्चन डॉनच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर शाहरुख खान त्याच्या दुसऱ्या भाग डॉन 2 मध्ये दिसला. आता चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची डॉन 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच या भागात बॉलीवूडमधील दमदार अभिनेता रणवीर सिंग दिसणार आहे. याआधी डॉन-३ चे शूटिंग पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणार होते, मात्र आता या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही समोर आलेले नाही.
डॉन ३ चे अपडेट आले समोर
रणवीर सिंग डॉन ३ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार आहे. फरहान अख्तरने या चित्रपटाची घोषणा केली होती, त्यानंतर चाहत्यांमध्ये याबद्दलची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, डॉन 3 च्या चाहत्यांना यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉन 3 चे शूटिंग पुढच्या वर्षी लवकर सुरु होणार होते पण आता ते काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. यापूर्वी चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2025 मध्ये सुरू होणार होते, परंतु आता ते जून 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
याआधीही अनेक वेळा रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली
‘डॉन 3’ ची घोषणा झाल्यापासूनच याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. यात काही अडचण नक्कीच आहे. सुरुवातीला लोकांनी त्याच्या कास्टिंगवर प्रश्न उपस्थित केले. या चित्रपटात शाहरुख खानऐवजी रणवीर सिंगला का कास्ट करण्यात आले, यावर लोक संतापले आहे. आता लोक चित्रपटाची तारीख पुढे ढकलल्याबद्दल आणखी रागावले आहे.
चाहत्यांनी दिला प्रतिसाद
यावर लोकांनी अनेक कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “आजच्या मार्केटमध्ये 200 कोटी रुपये वसूल करणे अवघड आहे. रणवीरला यातून बाहेर ठेवले तरच चालेल.” दुसऱ्याने लिहिले, “फरहानकडे हे करण्यासाठी पैसे नाहीत. तो स्पष्टपणे बाहेरच्या गोष्टी शोधत आहे.” तिसऱ्याने लिहिले, “मला वाटते की रणवीर त्याच्या करिअरच्या सर्वात वाईट टप्प्यात आहे.” असे लिहून अनेक चाहत्यांनी या चित्रपटाच्या मुख्यकास्टिंगबाबत संताप व्यक्त केला आहे.