(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या लग्नाबाबत एक मोठा इशारा दिला आहे. या पोस्टमध्ये ती बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलसोबत दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 11 आणि 12 डिसेंबरला गोव्यात लग्न करणार आहेत. मात्र, या तारखांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. अभिनेत्रीच्या या बातमीने चाहत्यांना आनंद झाला आहे. आता अभिनेत्री लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
कीर्ती सुरेशच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
कीर्ती सुरेशने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये अँटोनी थाटीलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो यंदाच्या दिवाळीचा असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करून त्यावर सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे ती म्हणाली, “15 वर्षे आणि प्रवास सुरूच आहे… या पोस्टवरून हे स्पष्ट होते की दोघांचे 15 वर्ष जुने आणि मजबूत नाते आहे. तसेच, तिने खुलासा केला की तिने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव “Nike” ठेवले आहे, जे त्याचे अभिनेत्रीच्या आणि अँटोनी यांच्या नावाने तयार करण्यात आले आहे.
अनेक कळकरांनी दिल्या शुभेच्छा
कीर्ती सुरेशच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला आहे आणि दोघांचेही सगळे भरभरून अभिनंदन करताना दिसत आहेत. तृषा कृष्णन, नाझरिया नाझिम, राशि खन्ना आणि संदीप किशन यांसारख्या स्टार्सनी त्याला कॉमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. या बातमी सगळ्यांनाच चकित करून ठेवले आहे.
कीर्ती सुरेशचे येणारे आगामी चित्रपट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कीर्ती सुरेश लवकरच ‘बेबी जॉन’मध्ये दिसणार आहे. हा तामिळ चित्रपट ‘थेरी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कॅलिस यांनी केले आहे. या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.