(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले आहे. या दिवाळीच्या काळात ही अत्यंत चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने सोशल मीडियावर रोहित बलच्या मृत्यूची माहिती दिली आहे. रोहित बल हे अनेक दिवसांपासून हृदयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारपणामुळे ते फॅशनच्या जगापासून दुरावले होते आणि लॅक्मे इंडिया फॅशन वीक त्यांचा शेवटचा शो होता. दिवाळीच्या मुहूर्तावर मनोरंजन क्षेत्रातील या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहित बलच्या निधनाच्या बातमीनंतर बी-टाऊन सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
हे देखील वाचा – ‘ग्लॅमरस गर्ल’ सई ताम्हणकर! दिवाळी स्पेशल लूकने वेधलं लक्ष…
रोहित बल अखेरचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसला होता
फॅशन डिझायनर रोहित बळ यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. फॅशन जगतातील एक स्टार कायमचा निघून गेला यावर रोहित बलच्या सर्व चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे. प्रकृती बिघडल्यामुळे रोहित बलने फॅशन जगतापासून बरेच दिवस अंतर राखले होते. लॅक्मे फॅशन वीक हा त्यांचा शेवटचा शो होता आणि इथे अनन्या पांडे त्याच्यासाठी शोस्टॉपर बनली होती. लॅक्मे फॅशन वीकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा व्हिडिओ शेअर करून रोहित बलची आठवण काढली आहे. फॅशन डिझायनरची तब्येत बिघडली असली तरी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे, हे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील खूप आनंद होत आहे.
हे देखील वाचा – दीपिका रणवीरची ‘दुआ’ मंजूर, लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी केले नाव जाहीर
रोहित बलचा जन्म श्रीनगरमध्ये झाला
रोहित बल यांचा जन्म 1961 साली झाला. श्रीनगरमध्ये जन्मलेल्या रोहित बलचे कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झाले होते. रोहित बलने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून फॅशनचा अभ्यास केला होते. रोहित बल यांनी 1986 मध्ये आपल्या भावासह ऑर्किड ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘कौन बनेगा करोडपती’ या क्विझ शोसाठी रोहित बलने पोशाख डिझाइन केले आहेत. रोहित बल हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. आणि आता त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
बॉलीवूड मधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून रोहित बाळ यांचे नाव खूप गाजत आहे. त्यांनी अनेक कलाकारांचे ड्रेस डिजाईन केले आहेत. त्यांची फॅशन डिजाईन चाहत्यांसह अनेक बॉलीवूड कलाकारांना देखील खूप आवडायची. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्याच्या कुटूंबासह बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कलाकारांना देखील धक्का बसला आहे.