"मी स्वतः माझ्या मुलीचं संगोपन करणार...", दीपिका पादुकोणने लेक दुआच्या संगोपनासाठी घेतला महत्वाचा निर्णय
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी आई- बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अशातच अभिनेत्रीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लेकीचं नाव ठेवले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या लेकीचं नाव तिने चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्रीने लेकीचं नाव सांगत, तिच्या नावाचा अर्थ सांगत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वीच दीपिकाने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये दीपिकाने लेकीच्या पायाचा फोटो पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये दीपिकाने आपल्या लेकीला पिंक कलरचा कुर्ता आणि पायजमा वेअर केलेला दिसत आहे. तिच्या ह्या ड्रेसच्या काठावर असलेले सिंपल डिझाईन पाहायला मिळत आहे. दीपिका आणि रणवीरने आपल्या लेकीचा अद्याप चेहरा दाखवलेला नसून फक्त तिचे पायच दाखवलेले आहे. दीपिका आणि रणवीरने आपल्या चिमुकलीचं नाव दुआ असं ठेवलेलं आहे. दुआ म्हणजेच प्रार्थना… अभिनेत्रीने लेकीचं नाव सांगून तिच्या नावाचा अर्थही सांगितला आहे.
नाव सांगताना आणि नावाचा अर्थ सांगताना अभिनेत्री म्हणते, “दुआ पादुकोण सिंह… ‘दुआ’ म्हणजेच प्रार्थना… कारण ती आमच्या प्रार्थनांचं उत्तर आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर” दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींकडूनही प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. दुआवर आणि दीपिका- रणवीरवरही प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. शिवाय सिंह कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. दीपिका- रणवीरने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून १४ लाख ६२ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
दीपिका आणि रणवीरला गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी कन्यारत्न झाला. कन्यारत्न झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. दीपिका ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाली, त्यानंतर तिने ८ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर दीपिकाला आणि तिच्या बाळाला आठवड्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. म्हणजेच १५ सप्टेंबरला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ज्यावेळी दीपिका आपल्या बाळासोबत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. त्यावेळी दीपिकाला आणि तिच्या बाळाला भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खान सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, दीपिका शेवटची ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर रणवीर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यासोबतच दीपिका आणि रणवीरचा नुकताच दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सिंघम अगेन’ रिलीज झाला आहे. या सिनेमाचे प्रेक्षक भरभरून कौतुक करीत असून दोघांच्याही अभिनयाचे जोरदार कौतुक केले जात आहे. आता रणवीर लवकरच ‘डॉन ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, दीपिका पदुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची भेट झाली होती. त्याचवेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ’83’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. त्यांचे हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.