फोटो सौजन्य - Social Media
आपल्या औदार्य आणि सामाजिक कार्यामुळे चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूदचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘फतेह’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आणि आता अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आणि ट्रेलर देखील असा आहे की त्यात खूप रक्तपात दिसून येत आहे. म्हणजे हा चित्रपट ॲक्शनने भरलेला असणार आहे. सोनू सूदसोबत जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोमान्स आणि कॉमेडीसह अनेक भावनांना पडद्यावर आणणारा सोनू सूद लवकरच मोठ्या पडद्यावर आपल्या ॲक्शनची जादू चालवणार आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेता फतेह या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षीच त्याच्या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता अभिनेत्याने फतेहचा ट्रेलर रिलीज केला आहे.
सोनू सूदचे दिग्दर्शनाच्या जगात वरदान
सोनू सूदसाठी हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शनाची जबाबदारीही घेतली आहे. आणि तो ‘फतेह’च्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. सोनू सूद अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन करत असून त्याचा ट्रेलरही प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित आहे. अभिनेता आपला ॲक्शन पराक्रम दाखवताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अनेक मोठे कलाकार देखील पाह्यला मिळणार आहेत.
Sachet-Parampara: सचेत-परंपराने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर शेअर केली बाळाची झलक!
कधी रिलीज होणार चित्रपट?
ट्रेलरच्या सुरुवातीलाच हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोनू सूद आणि जॅकलीन व्यतिरिक्त ट्रेलरमध्ये नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील आहेत. या चित्रपटातील ॲक्शन सीन हॉलिवूड तंत्रज्ञांनी डिझाइन केले आहेत. ‘फतेह’ हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 2.58 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये ‘अच्छे लोक के साथ तो बुरा नहीं होता’ अशी ओळ लिहिले आहे. तसेच या ट्रेलरने चाहत्यांच्या मनात हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण केली आहे.
Orry: ओरीच्या हाती लागला प्रसिद्ध दिग्दर्शक भन्साळीचा चित्रपट; दीपिका पदुकोण दिसेल खास भूमिकेत!
चाहत्यांचा मिळाला प्रतिसाद
सोनू सूदच्या चित्रपटातील ॲक्शन पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. एका यूजरने लिहिले की, “ट्रेलर आवडला. ॲक्शन सीनने मला चकित केले.” तर “प्रतीक्षा पूर्ण झाली,” असे एका चाहत्याने लिहिले. लोकांनी अभिनेत्याच्या ॲक्शन सीन्सला आग असे वर्णन केले आहे. फतेहमधील सोनू सूदचा लूक पाहून लोकांना जॉन विकची आठवण देखील आली. चाहत्यांनी अभिनेत्याच्या लूकची तुलना जॉनशी केली आहे. आणि या ट्रेलरला भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत.