फोटो सौजन्य - Social Media
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील कलाकार दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत. या चित्रपटात आधीच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल सारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता या कलाकारांमध्ये आणखी एका मनोरंजक नावाची भर पडली आहे. या चित्रपटामध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला ओरी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील खास भूमिकेत दिसणार आहे.
भन्साळीच्या चित्रपटात दिसणार ओरी
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोशल मीडिया सेन्सेशन ओरी देखील या चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय आहे. तो अनेकदा सेलिब्रिटींसोबत फोटो क्लिक करताना दिसतो. आता ताज्या अहवालात दावा केला जात आहे की तो भन्साळींच्या चित्रपटाचा भाग असेल. ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पंरतु ओरी या चित्रपटाचा भाग असल्याचे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
Bigg Boss 18 : चुम दारंग विवियन डिसेना आमनेसामने! म्हणाली – मी तुझ्यापेक्षा जास्तच…
चित्रपटात झळकणार हे कलाकार
या चित्रपटात ओरी एक समलैंगिक पात्राची भूमिका साकारणार आहे, जो आलियाचा सर्वात जवळचा मित्र असेल. या चित्रपटात आलिया कॅबरे डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी आलियाने बरीच तयारी केली आहे. या चित्रपटात आपल्या नव्या अवताराने पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू करण्याचा ती पूर्ण प्रयत्न करत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशल भारतीय सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या तिघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत.
जया बच्चन यांची आवडती गोष्ट कोणती ? ‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर बिग बींनी केला खुलासा
दीपिकाचा कॅमिओ असणार आहे
या चित्रपटात दीपिका पदुकोणही छोट्या भूमिकेत दिसणार आहे, मात्र तिच्या भूमिकेबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. दीपिका आणि भन्साळी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. आणि आता दीपिका या चित्रपटातही खा भूमिका साकारणार आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट निर्माते 20 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहेत. त्यामुळे ते चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत.