(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपट निर्माते अनुराग कश्यप त्यांच्या ‘निशानची’ या चित्रपटातून पुनरागमन करत आहेत. यावेळी त्यांच्या चित्रपटात ते महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली कुटुंबांपैकी एक असलेल्या एका नवीन कलाकाराची ओळख करून देणार आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून बाळ ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे आहे. तो या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट असून, हा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे. ‘निशानची’ चित्रपटाचा टीझर हा चित्रपट भावना आणि नाट्याने भरलेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.
अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ॲक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या या टीझरमुळे अनेक सेलिब्रिटीही भारावून गेले आहेत.
तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज
आहान पांडे, बनीता संधू, विनीते कुमार सिंग यांच्यासह अनेक स्टार्सनी टीझरचे कौतुक केले आहे. ‘सैयारा’ या आगामी प्रोजेक्टमधून झळकणारे नवे अभिनेता आहान पांडे यांनी टीझर शेअर करत लिहिले, “ऐश्वर्य ठाकरे आम्हाला माहिती आहे तू किती मेहनत केलीस आणि तुला हे किती महत्त्वाचं आहे. आता तुझा क्षण आलाय टायगर, तुझी तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. वेदिका तू नेहमीसारखीच जबरदस्त आहेस…तसेच, अनुराग कश्यप सर, तुमच्या आवडत्या शैलीत परतल्याबद्दल धन्यवाद!” असे लिहून अभिनेत्याने चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे.
याचदरम्यान, विनीत कुमार सिंह यांनी लिहिले की, “शानदार”, तर भूमी पेडणेकर यांनी उत्साह व्यक्त करत लिहिलं, “खूप छान. अनुराग सर, तुमचं काम मिस करत होतो”. तर, बनीता संधू यांनी लिहिले की, “हा चित्रपट पाहण्यासाठी थांबूच शकत नाही.” ‘निशानची’ मध्ये ऐश्वर्य ठाकरे यांचा जबरदस्त डेब्यू पाहायला मिळणार आहे, अभिनेत्याने एका हाय-एनर्जी डबल रोलमध्ये कमाल केली आहे. अभिनेत्याच्या जोडीला वेदिका पिंटो असून, मोनिका पंवार, मोहम्मद ज़ीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा हे सगळे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
टीझरमधून अनुराग कश्यप यांच्या शैलीचा ठसा स्पष्ट दिसतो आहे. एक असा सिनेमॅटिक अनुभव जो मोठ्या पडद्यावर पाहणं हे प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे, कारण अशा प्रकारची सिनेमॅटिक शैली हल्ली क्वचितच पाहायला मिळते.
‘निशानची’ ची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंग (जार पिक्चर्स) यांनी फ्लिप फिल्म्स च्या सहकार्याने केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग कश्यप यांनी सांभाळली आहे. या सिनेमाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी मिळून लिहिली आहे. ‘निशानची’ १९ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.