(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा ‘हीरो नंबर 1’ गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बराच काळ शूटिंगला उशिरा पोहोचण्याच्या आरोपांवर आता त्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गोविंदाने काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात हजेरी लावलेली. यावेळी त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलही सांगितलं. कार्यक्रमात गोविंदाने त्याच्या पत्नीबद्दल व घटस्फोटाच्या अफवांबद्दलही सांगितलं.
गोविंदा सेटवर उशिरा यायचा अशा चर्चा लोक करतायत यावर गोविंदा म्हणाला आहे की, मी सेटवर उशिरा जातो म्हणून मला बदनाम केलं गेलं. मग मी म्हटलं, कोणामध्ये एवढी ताकद आहे का की तो दिवसाला पाच शिफ्ट करून वेळेवर जाऊ शकेल”
गोविंदा याबद्दल पुढे म्हणाला, “हे शक्यच नाहीये. होऊच शकत नाही. इतकं शूटिंग कसं करू शकतं एखादा माणूस. इकडे तर एका चित्रपटातच थकतात लोक.” याबद्दल गोविंदाने असंही सांगितलं की, काही वेळा गोष्टी त्याच्या हाताबाहेर होत्या, जसं की ट्रॅफिक, वेळापत्रक आणि इतर गोष्टी; ज्यामुळेही त्याला उशीर व्हायचा, पण याबद्दल अनेकदा बातम्या यायच्या. लोक खूप चर्चा करायचे. त्याने असंही म्हटलं की, उलट एका व्यक्तीची बदनामी करण्यापेक्षा बॉलीवूडमधील लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे.
‘एक दीवाना की दीवानियत’ विरुद्ध ‘थामा’, दिवाळीत थेटर वॉर; PVR INOX वर पक्षपाताचा आरोप!
लोकप्रिय अभिनेता रजत बेदीनेसुद्धा गोविंदाच्या सेटवर उशिरा येण्याबद्दल बोलत संजय दत्तचा एक किस्सा सांगितलेला. सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणालेला की, “जोडी नं १च्या सेटवर संजय दत्त खूप रागावलेला. त्याने डेविड धवनला पूर्ण सीन बदलायला सांगितलेला. गोविंदासाठी ८ तास थांबूनही तो आला नव्हता. त्यांना तेव्हा कळलं की गोविंदा त्याच्या घरीसुद्धा नाहीये तर थेट हैदराबादहून सेटवर येणार होता. याबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती. गोविंदा कधी येणार आहे याची माहिती कोणालाच नव्हती, कारण तेव्हा तो दिवसाला ४-५ शिफ्टमध्ये काम करायचा.”
गोविंदा यांचा ‘कुली नंबर 1’, ‘हीरो नंबर 1’, ‘राजा बाबू’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे बॉलीवूडमध्ये भक्कम जम बसला होता. मात्र गेल्या काही वर्षांत ते फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या २०१९ साली आलेल्या ‘रंगीला राजा’ नंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं नाही.