(फोटो सौजन्य - अकाउंट)
शिंपी कन्हैया लालच्या क्रूर हत्येवर आधारित ‘ज्ञानवापी फाइल्स: अ टेलर मर्डर स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले, जे एका बहुप्रतिक्षित प्रकल्पाची सुरुवात आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे. जो खूप आकर्षित वाटत आहे.
थोडी खट्याळ, गोंडस आणि हळवी कहाणी! अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंच्या ‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर रिलीज
चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज
निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा आज २ एप्रिल २०२५ रोजी सोशल मीडियावर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘अशा कथेचे साक्षीदार व्हा जे समजणे महत्वाचे आहे .’ ‘ज्ञानवापी फाइल्स: अ टेलर मर्डर स्टोरी’ २७ जून रोजी थिएटरमध्ये.’ असे लिहून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
या चित्रपटाच्या संवेदनशील स्वरूपामुळे, चित्रपटाच्या घोषणेमुळे आधीच लक्षणीय चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट निर्मात्यांनी अद्याप कथा कशी सांगायची याबद्दल तपशील उघड केलेले नसले तरी, या प्रकल्पात हत्येचा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा सखोल अभ्यास केला जाण्याची अपेक्षा आहे. हा चित्रपटात नक्कीच प्रेक्षकांना चांगले कायतरी देणार आहे.
संपूर्ण प्रकरण काय होते?
खरं तर, जून २०२२ मध्ये उदयपूरमध्ये दोन हल्लेखोरांनी कन्हैया लालचा शिरच्छेद केला होता. नंतर हल्लेखोरांनी हत्येची कबुली देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टचा बदला घेतल्याचा दावा केला. भाजपचे माजी प्रवक्ते शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल टिप्पणी करून वाद निर्माण केला होता, ज्यामुळे व्यापक निदर्शने झाली होती.