
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा चित्रपट ‘हक’ बॉक्स ऑफिसवर अपवादात्मक कामगिरी करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट नक्की पहा असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी लक्षणीय वाढ दिसून आली आहे. तसेच दुसऱ्या दिवसाची चित्रपटाची किती कमाई झाली हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच या चित्रपटामध्ये यामी गौतम आणि इमरान हाश्मी या दोघांचेही काम पाहण्यासारखे आहे.
अनुष्का शर्मा 7 वर्षांनंतर करणार कमबॅक, वर्षानुवर्षे रखडलेला ‘चकदा एक्सप्रेस’ OTTवर होणार रिलीज?
हक चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, हकने दुसऱ्या दिवशी ₹३.३५ कोटी कलेक्शन केले. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. परंतु, जर दुसऱ्या दिवशी ₹३.३५ कोटी कलेक्शन केले तर आतापर्यंत त्याचे एकूण कलेक्शन ₹५.१० कोटी झाले आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. तसेच आता हा चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
And the GOOD FILMS always find its AUDIENCE as #HAQ is showing 100% GROWTH on 2nd Saturday 🔥🔥🔥 The Positive Word of mouth is helping BIG TIMES NOW !! 🌋 @yamigautam @JungleePictures pic.twitter.com/OIlSoAycna — CineHub (@Its_CineHub) November 8, 2025
यासह, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. यामी गौतमने या वाढीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, सिनेहबने X वर पोस्ट शेअर केली आहे, “एक चांगला चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना शोधतो.” ‘हक’ने दुसऱ्या दिवशी १०० टक्के कमाईत वाढ केली आहे. सकारात्मक वर्ड-ऑफ-माउथ चित्रपटाला मदत करत आहे. या पोस्टवर यामी गौतमने प्रतिक्रिया दिली. आणि लिहिले “चांगल्या हेतूने आखलेला चित्रपट अखेर प्रेक्षक मिळवतो. धन्यवाद.”
हा चित्रपट महिलांच्या हक्कांबद्दल आहे. यात शाझिया बानो तिच्या पती अब्बास खानविरुद्ध न्यायालयात जाऊन स्वतःसाठी आणि मुलांसाठी योग्य भरपाई मागताना दाखवली आहे. हा चित्रपट १९८५ च्या शाह बानो तिहेरी तलाक प्रकरणापासून प्रेरित आहे. शाह बानो यांच्यावर आधारित ही कथा आहे. चित्रपट नुकताच रिलीज झाला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हा चित्रपट सुपरन वर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. यामी गौतम आणि इमरान हाश्मी पती पत्नीच्या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट भावनांनी भरलेला आहे. यामी गौतम आणि इमरान हाश्मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी चाहत्यांना भेटण्यासाठी थिएटरमध्येही भेट दिली, यामीने तिथे एका भावनिक चाहत्याला सांत्वन दिले.