Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय नार्वेकरांचा ‘बाबा खत्री’ च्या भूमिकेत Comeback! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर ठरला धमाकेदार

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट आता लवकरच सिनेमागृहात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहे. 'साडे माडे तीन’च्या यशानंतर अखेर पुन्हा एकदा कुरळे ब्रदर्स प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 11, 2026 | 08:29 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजय नार्वेकरांची ‘बाबा खत्री’ भूमिकेत एन्ट्री
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा बोनस टिझर रिलीज
  • ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कधी होणार प्रदर्शित?
 

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्स सज्ज झाले आहेत. या भावांच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील ‘भाऊ तिर्री तिर्री’ या मजेशीर आणि भन्नाट ट्यूनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्यूनवर उलगडणारे प्रसंग, पात्रांमधील नोकझोक आणि एकामागोमाग येणाऱ्या गंमतीशीर घटनांमुळे संपूर्ण चित्रपटात हलकाफुलका, एंटरटेनिंग माहोल तयार होतो. विशेषतः बाबा खत्रीच्या एंट्रीनंतर घडणाऱ्या विनोदी सीनमुळे कथेला वेगळाच ट्विस्ट मिळणार आहे. चित्रपटामध्ये भरभरून विनोदाचा बोनस आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे.

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

संजय नार्वेकर या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत, अभिनेत्याच्या येण्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कॉमेडीचा डोस अधिकच वाढणार असून, ‘तिर्री तिर्री’च्या धमाल तालावर प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याची पूर्ण तयारी या चित्रपटाने केली आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेला हा चित्रपट चित्रपटगृहात कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट एंटरटेनर ठरणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे.

मोठी बातमी! ‘धुरधंर’ Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

तसेच चित्रपटाचे उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. आता हा चित्रपट १३ फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होत असून, तो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Punha ekda sade made teen bonus teaser sanjay narvekar fun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर Gold बाबत मोठे अपडेट! देशात लवकरच सुरू होणार ‘बुलियन बँक’;काय होणार फायदा?
1

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर Gold बाबत मोठे अपडेट! देशात लवकरच सुरू होणार ‘बुलियन बँक’;काय होणार फायदा?

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
2

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…
3

Oil and LPG Stock: देशात 60 दिवसांचा पेट्रोल-डिझेल आणि 45 दिवसांचा गॅस शिल्लक, सरकारचा खुलासा आता…

कारमध्ये AC लावताच येतोय कुबट वास?घाबरू नका, घरच्या घरी ‘या’ सोप्या ट्रिकने होईल सुटका
4

कारमध्ये AC लावताच येतोय कुबट वास?घाबरू नका, घरच्या घरी ‘या’ सोप्या ट्रिकने होईल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.