
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. नताशा स्टॅनकोविच सोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक माहिकाला डेट करत असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.हार्दिक पंड्याने या आठवड्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.
त्यात त्याचा मुलगा अगस्त्यसोबतचे गोंडस क्षण, गर्लफ्रेंड आणि मॉडेल माहिका शर्मासोबतचे रोमँटिक फोटो आणि सराव मैदानावरील स्पष्ट फोटो होते. ही इंस्टाग्राम पोस्ट लगेचच इंटरनेटवर व्हायरल झाली. याची दोन प्रमुख कारणे होती: पहिले, हार्दिकच्या घरी झालेल्या पूजा समारंभाचे फोटो. दुसरे, गर्लफ्रेंड माहिका शर्माच्या बोटावर चमकणारी एक मोठी हिऱ्याची अंगठी. या अंगठीने लगेचच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि साखरपुड्याच्या अफवा पसरू लागल्या.
यावरूनच दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा रंगताना दिसत आहे. तथापि, हार्दिक पंड्या, माहिका शर्मा किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे सर्व दावे सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांच्या आधारावरच करण्यात येत आहेत.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
आता मॉडल माहिका शर्मा देखील प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. ती लवकरच हार्दिक पांड्याच्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती मिळत आहे. अश्या अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सततच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिने मोठा खुलासा केला आहे. यावर मात्र हार्दिक पांड्याने बोलणे टाळले आहे. पण माहिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
पोस्ट शेअर करत माहिकाने म्हटले की, मी इंटरनेटवर पाहत आहे की, माझा साखरपुडा झाला आहे, पण मी तुम्हाला सांगते की, मी रोज चांगले दागिने घालते. याच पोस्टमध्ये तिने एक मुलीला गुलाबी बाळाच्या गाडीत बसलेले दाखवले आहे आणि लिहिले आहे, प्रेग्नंसीच्या अफवांशी लढण्यासाठी मी या गाडीत बसू शकते का?” सध्या सोशल मीडियावर माहिका शर्माची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नताशा आणि हार्दिक पंड्या एकमेकांना डेट करत असतानाच नताशा प्रेग्नंट झाली होती, त्यानंतर हार्दिकने अगदी साध्या पद्धतीने नताशासोबत लग्न केले. हार्दिकच्या कुटुंबियांना देखील त्याच्या लग्नाची कल्पना नव्हती. अगोदर त्याने तिला प्रपोज केला आणि थेट लग्न केले. लग्नाच्या काही दिवसानंतर नताशाने अगस्त्यला जन्म दिला. त्यानंतर लग्नाच्या काही वर्षानंतर थाटात लग्न राजस्थानला नताशा आणि हार्दिकने केले. नंतर काही दिवसातच या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला .