(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“सनम तेरी कसम” नंतर, अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा प्रेमात वेडा झालेला दिसत आहे. आणखी एक भावनिक प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याच्या आगामी “एक दिवाने की दिवानियात” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चाहते चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. ट्रेलर पाहून ते चकीत झाले आहेत. आणि चित्रपट पाहण्यासाठी आतुर आहेत.
“एक दिवाने की दिवानियात” चित्रपटात एक तीव्र प्रेमकथा पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटामध्ये हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
गाण्यांना मिळाला चांगला प्रतिसाद
ट्रेलरपूर्वी, चित्रपटाचा टीझर आणि गाण्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत शीर्षकगीतांसह तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. तिन्ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली आहेत आणि ती अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता, ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. तसेच या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत. ट्रेलरमध्ये अनेक रहस्य दाखवण्यात आले आहेत.
मंजिरीचा डाव पुन्हा फसणार; सत्याचा विजय होणार, ‘तुला जपणार आहे’ मालिकेला नवं वळण
‘थामा’ चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर स्पर्धा
मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करताना दिसणार आहे. ‘थामा’ हा चित्रपट मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे. या चित्रपटाभोवती बरीच चर्चा आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परिणामी, ‘एक दीवाने की दीवानियात’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. आता चित्रपट पुढे काय धमाल करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.