(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
‘तुला जपणार आहे’ मालिकेत प्रेक्षकांना एक नव, नाट्यमय वळण अनुभवायला मिळणार आहे. मंजिरीने अथर्व आणि मीराच्या नात्यात जवळीक यावी आणि ते अधिक खुलाव यासाठी देवीचा पारंपरिक गोंधळ आयोजित केला आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या मनात काही वेगळाच डाव सुरू आहे. मीराला घराबाहेर जाऊ न देण्याचा तिचा कट आहे, ज्यामुळे तिला अंबिकाला कैदेत ठेवता येईल.
गोंधळाच्या निमित्ताने मंजिरी तिच्या जवळ असलेल्या काळ्या जादूची क्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. यासाठी घरात एक लक्ष्मण रेषा आखली जाते जी मीरा ओलांडू शकणार नाही, असा नियम मंजिरी लादते. या कठीण प्रसंगात देवी आजी प्रकट होते आणि मीराला तिचं कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करते. देवी आजीच्या मार्गदर्शनानुसार मीरा भीतीवर मात करत घराबाहेर पडणार आहे. यासोबतच बहिणींच्या गूढ गोष्टीचा उलगडा मालिकेच्या कथानकला नवा वळण देणार आहे. मंजिरीचा डाव पुन्हा फसणार आहे. मीराच्या विश्वास आणि देवी आजीच्या आशीर्वादामुळे सत्याचा विजय होणार आहे.
मिलिंद सोमणने केले पत्नी अंकिताचे कौतुक, आयर्नमॅन पूर्ण करणारी ठरली पहिली आसामी महिला
झी मराठीवरील ‘तुला जपणार आहे’ ही मालिका एक अध्यात्मिक, रहस्यमय आणि भावनिक कथानक घेऊन प्रेक्षकांसमोर आली आहे. या मालिकेत दोन बहिणींच्या गूढ नात्याची ही कथा आहे. मीरा आणि अंबिका,ज्या लहानपणी एकमेकींपासून दूर होतात आणि नंतर नाट्यमय वळणांनंतर पुन्हा एकत्र येतात.मालिकेत काळी जादू, अंधश्रद्धा, श्रद्धा, आणि भावनात्मक संघर्ष प्रभावीपणे उभा केला आहे.. मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.
‘दिया और बाती हम’ फेम अलान कपूर आणि रविराने केले लग्न, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
रहस्यमय आणि शक्तिशाली स्त्री पात्र. मीराची आई असून, एका गूढ ठिकाणी अडकलेली आहे. अंबिकाची भूमिका ही संपूर्ण कथानकाचा केंद्रबिंदू आहे.या मालिकेत मीरा नावाचे पात्र म्हणजे अंबिकाची हरवलेली मुलगी. श्रद्धा, धैर्य आणि सत्यासाठी लढणारी तरुणी. ही मालिका खलनायिका मंजिरीच्या कारस्थानांनी अधिक रंगतदार होते. शर्वरीने या नकारात्मक भूमिकेला जबरदस्त न्याय दिला आहे. मीराच्या आयुष्यातील महत्त्वाचा पुरुष. संवेदनशील आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व असलेला अथर्व कथानकातील संतुलन राखताना दिसत आहे.