(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नुकताच झी मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. हा सोहळा लवकरच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. यादरम्यान झी मराठीवरील मालिकांच्या नॉमिनेशनचा सोहळा पार पडला. आता सोशल मीडियावर या सोहळ्यामधल्या काही क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी या पुरस्कार सोहळ्यमध्ये कलाकारांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तींनी देखील रंगमंचावर उपस्थिती लावली. यावेळी पारु मालिकेतल्या आदित्यने म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने एक पुरस्कार जिंकला. तो स्वीकारताना त्याची पत्नी अमृता आणि आई दोघेही उपस्थित होत्या.
‘दिया और बाती हम’ फेम अलान कपूर आणि रविराने केले लग्न, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
पुरस्कार स्विकारतेवेळी प्रसाद जवादेची पत्नी आणि अभिनेत्री अमृता देशमुखने डोळे पाणवणारा किस्सा शेअर केला. प्रसादच्या आईला गेल्या दिवाळीत कॅन्सरचे निदान झाले होते. यावेळी अभिनेत्याने शूटिंग, घर, आईची तब्येत, बायकोसाठी वेळ या सर्व गोष्टी कश्या उत्तम पार पडल्या याबद्दल अमृताने अभिमानाने सांगितले आणि त्याचे कौतुक केले. पत्नी अमृता आणि आई या दोघीनाही त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.
पुरस्कारवेळी अमृता म्हणाली की, ‘गेल्यावर्षी दिवाळीमध्ये काकूंना कॅन्सरचे पुन्हा निदान झालं आहे हे आम्हाला कळलं. काकूंचं स्वप्न होतं की प्रसादला मला पुन्हा एकदा रोज टीव्हीवर किंवा एखाद्या डेली सोप मध्ये पाहायचं आहे. एकीकडे पारूचं शूट सुरू होतं आणि दुसरीकडे आम्ही त्यांची ट्रीटमेंट लगेचच सुरू केली. प्रसादला मी पाहिलंय म्हणजे जी व्यक्ती कधीतरी अतिशय बालिश वाटू शकते, तो आधी पटकन बोलतो आणि नंतर विचार करतो मग त्याला त्याचा त्रास होतो… असे त्याचे खूप पैलू आहेत. पण जेव्हा मी त्याला काकूंचाच वडील झालेलं पाहिलं तेव्हा मला त्याची एक वेगळी बाजू दिसली.’ असे अमृता म्हणाली.
मिलिंद सोमणने केले पत्नी अंकिताचे कौतुक, आयर्नमॅन पूर्ण करणारी ठरली पहिली आसामी महिला
पुढे प्रसाद जवादेची आई म्हणाली की, ‘माझ्या आधी तर हॉस्पिटलमध्येच सगळ्यांनी त्याचं नाव श्रावण बाळ पाडलं आहे. आणि खरोखरच तो श्रावण बाळासारखा आहे. आधुनिक काळातला तो श्रावण बाळ आहे! म्हणजे त्याला जे पारितोषिक मिळालं आहे ते तंतोतंत खरं आहे.’ असं म्हणून आईने देखील मुलाचे कौतुक केले.
आई आणि पत्नी बोलत असताना प्रसादचे डोळे पाणावले. प्रसादच्या आईच्या सांगण्यावरुन त्याला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ मुलाचा अवॉर्ड मिळाल्याचे जाणवते. प्रसाद आणि अमृताबद्दल बोलायचे झाल्यास बिग बॉस मराठीमध्ये दोघांची जोडी जुळली. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दोघांनी साखरपुडा झाल्याचे जाहिर केले. आणि काही काळाने या दोघांनी लग्न केले आणि चाहत्यांना खुश केले.