(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेता हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या ‘एक दीवाने की दीवानियात’ या रोमँटिक लव्हस्टोरी चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. चित्रपटात एक तीव्र प्रेमकथा पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘सनम तेरी कसम’ चित्रपटानंतर हर्षवर्धन राणेचा दुसऱ्या रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझरमध्ये हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. तसेच, टीझर रिलीज होताच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गायक, गिटारवादक Brent Hinds यांचे रस्ते अपघातात निधन; वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रेम- रोमान्स पासून वेदना आणि द्वेषापर्यंतची कथा
टीझरची सुरुवात मुसळधार पावसाच्या दृश्याने होते, जिथे सर्वजण छत्री घेऊन उभे असतात. यानंतर हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांची झलक दिसते. दरम्यान, हर्षवर्धन राणे यांच्या आवाजात एक व्हॉइस ओव्हर ऐकू येतो, ज्यामध्ये तो म्हणतो, ‘माझ्यासाठी तुझ्यावर असलेले प्रेम हे फक्त वेडसर नाही तर, ते मरेपर्यंत राहील.’ यानंतर, हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या विभक्त होईपर्यंतच्या प्रेमकथेची कहाणी पाहायला मिळते. टीझर पाहून कळते की हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा एक तीव्र प्रेमकथा घेऊन सज्ज झाला आहे, ज्यामध्ये प्रेम आणि प्रणय ते वेदना आणि द्वेषापर्यंत सर्व काही पाहायला मिळणार आहे.
हर्षवर्धन राणेला नष्ट करण्यासाठी निघाली सोनम बाजवा
टीझरमध्ये एकामागून एक अनेक काव्यात्मक संवाद ऐकायला मिळत आहेत. या १ मिनिट ४० सेकंदाच्या टीझरमध्ये हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्यातील प्रेम आणि द्वेषाची कहाणी पाहायला मिळणार आहे. टीझरच्या सुरुवातीला दोघेही रोमान्स करताना दिसत असले तरी, टीझरच्या शेवटी दोघेही एकमेकांचा द्वेष करू लागतात. टीझरच्या शेवटी, सोनम बाजवाची व्यक्तिरेखा हर्षवर्धन राणेच्या व्यक्तिरेखेला म्हणते की ‘माझ्या हृदयात तुझ्यासाठी प्रेम नाही, फक्त द्वेष आहे. तुला नष्ट करणारी दिवाणीची दिवानियत आहे.’ टीझरमधील हटके संवादाने प्रेक्षक आता चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
सलमान खानने लडाखमध्ये सुरु केले ‘Battle of Galwan’चे शूटिंग, BTS फोटोने वाढली उत्सुकता
‘एक दिवाने की दिवानियात’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘एक दिवाने की दिवानियात’ हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित होणाऱ्या दिनेश विजनच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स चित्रपट ‘थामा’ शी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करताना दिसणार आहे. तसेच आता ‘एक दिवाने की दिवानियात’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.