(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण सलमानने त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले आहे. चित्रपटाचे पहिले चित्रीकरण लडाखमध्ये सुरू झाले आहे. हा चित्रपट २०२० मधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्षावर आधारित आहे. मोठे क्रूर युद्ध मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच लडाखमध्ये सुरू झालेल्या चित्रीकरणदरम्यान सलमानचा बीटीएस फोटो व्हायरल होत आहे. या फोटोने चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढवली आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे शूटिंग सुरू
या फोटोमध्ये सलमान खान निळ्या कपड्यांमध्ये पाठमोरा उभा आहे. मात्र, त्याचा चेहरा दिसत नाही आहे. हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा फोटो रिलीज झाल्यानंतर सलमानचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी मुंबईतील शूटिंग काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले होते. आता २२ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत लडाखमध्ये ॲक्शन सीन्स शूट केले जाणार आहेत.
Superstar #SalmanKhan joins the prestigious #GalwanValley team 🇮🇳 His aura, intensity & larger-than-life presence will take this patriotic saga to another level
Bollywood’s Tiger steps into #GalwanValley, 💥 His charisma + action = guaranteed blockbuster storm! pic.twitter.com/TpZnDiO1t6
— taran adarsh (@taran__adrash) August 21, 2025
गलवानची लढाई दिसणार मोठ्या पडद्यावर
‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन लष्करी संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय सैनिकांचे धैर्य आणि बलिदान दाखवले जाणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा चित्रपट बनवला जात आहे. सलमान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबूची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केले आहे, ज्यांनी ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’सारखे चित्रपट बनवले आहेत. चित्रांगदा सिंह, जेन शॉ, अंकुर भाटिया, हर्षिल शाह, हीरा सोहल, अभिलाष चौधरी आणि विपिन भारद्वाज हे कलाकार देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
गायक, गिटारवादक Brent Hinds यांचे रस्ते अपघातात निधन; वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सलमान खानचे आगामी चित्रपट
सलमान शेवटचा ‘सिकंदर’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदानाने महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी संजय ‘सिकंदर’ राजकोटची भूमिका साकारली होती. तसेच, चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. याचदरम्यान, आता सलमान ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे अभिनेताये शूटिंग सुरू केले आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.