Hina Khan (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
हिना खान सध्या स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरने त्रस्त आहे. अभिनेत्री तिच्या तब्येतीचे अपडेट्सही तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून आशीर्वाद मिळत आहेत. अभिनेत्रीने शेअर केले होते की जेव्हा तिचे केमोथेरपी सत्र सुरू झाले तेव्हा तिने तिचे केस कापले कारण केमो दरम्यान केस गळू लागतात. याचदरम्यान तिने आपल्या केसांचा विग तयार केला आहे. आता नुकताच हिनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती स्वतःच्या केसांनी बनवलेला विग घातलेली दिसत आहे. यासोबत तिने एक लांबलचक नोट देखील शेअर केली आहे ज्यामध्ये तिने लिहिले आहे की अशा प्रकारे ती तिच्या केसांच्या जवळ आहे.
हिनाने एक सुंदर नोट लिहून शेअर केला फोटो
अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना हिनाने लिहिले की, “ज्या क्षणी मला कळले की माझे केस गळतील, तेव्हा मी स्वतःच्या अटींवर ते कापण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी मी माझ्या स्वत: च्या केसांचा विग बनवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे मला या आव्हानात्मक काळात आराम मिळाला. मी हा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. अशाच प्रकारच्या संघर्षातून जात असलेल्या सर्व शूर महिलांना मला एक विशेष संदेश पाठवायचा आहे.” असं अभिनेत्रीने या पोस्ट मध्ये लिहिले. जे पाहून चाहत्यांनादेखील तिचा अभिमान वाटू लागला आहे.
हे देखील वाचा- ‘इमर्जन्सी’ चित्रपटानंतर कंगना रणौतला करायचे आहे तीन खानसह काम, म्हणाली…
चाहत्यांनी केले अभिनेत्रीचे कौतुक
ही पोस्ट शेर केल्यापासून चाहते कमेंट सेक्शनमध्ये हिनाचे कौतुक करताना दिसत आहेत. चाहते तिला धाडसी मुलगी म्हणत आहेत. यापूर्वी हिनाचा जिवलग मित्र शाहीर शेख तिला भेटायला गेला होता. अभिनेत्याने फोटो शेअर केला होता आणि त्याने ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली होती.