(फोटो सौजन्य- Social Media)
हिमाचल प्रदेशच्या मंडीची खासदार झाल्यानंतर कंगना राणौतचा पहिला चित्रपट ‘इमर्जन्सी’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत पूर्णपणे झळकताना दिसली आहे. कंगना या चित्रपटाची दिग्दर्शक आणि निर्माता दोन्ही आहे. या दमदार चित्रपटाचा ट्रेलरही त्यांनी धमाकेदारपणे रिलीज केला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज
‘इमर्जन्सी’ हा 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट करण्यासाठी कंगनाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. ट्रेलरमध्ये तिचा मेकअप पाहिला तर कंगना त्यात पूर्णपणे परफेक्ट दिसत आहे. कंगनाने इंदिरा गांधींचे केस, त्यांची मान हलवून बोलण्याची पद्धत, त्यांची चाल इत्यादी सर्व गोष्टींची नक्कल करण्याचा प्रयत्न अभिनेत्रीने अत्यंत चांगला केला आहे.
कंगनाला तिन्ही खानसोबत करायचे आहे काम
‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी कंगनाने या चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. यासोबतच शाहरुख, सलमान आणि आमिर या इंडस्ट्रीतील तीन मोठ्या खानबद्दल ती असं काही बोलली की उपस्थित लोकांना टाळ्या वाजवायला भाग पाडले. कंगनाने या तिघांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कंगनाला विचारण्यात आले की, तिला सलमान, शाहरुख आणि आमिरसाठीही चित्रपट बनवायचा आहे का? यावर अभिनेत्री म्हणाली की तिला तिघांसाठी एक चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मिती करायची आहे. तिला त्यांच्यासाठी एक चित्रपट बनवायचा आहे, जो तिघांची कलात्मक बाजू आणि सर्जनशील प्रतिभा दर्शवेल.” असं अभिनेत्रीने सांगितले आहे.
#KanganaRanaut would love to direct a film with 3 Khans #ShahRukhKhan #SalmanKhan and #AamirKhan #MovieTalkies pic.twitter.com/B3OcqRSenc
— $@M (@SAMTHEBESTEST_) August 14, 2024
‘इमर्जन्सी’ची स्टार कास्ट
‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये मिलिंद सोमण फील्ड मार्शल सॅम बहादूरची भूमिका साकारणार आहे. तर विसाक नायर संजय गांधी यांची भूमिका साकारणार आहे. अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार असून ते इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करताना दिसणार आहेत. याशिवाय श्रेयस तळपदे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार असून महिमा चौधरी लेखक पुपुल जयकर यांची भूमिका साकारणार आहे.