(फोटो सौजन्य - Instagram)
अक्षय कुमार, नर्गिस फाखरी, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, रितेश देशमुख आणि सौंदर्या शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला तरुण मनसुखानीचा ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट भारतात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील धमाकेदार कमाई केली आहे. ६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.
तसेच ‘हाऊसफुल५’ सोबत कमल हसन, सिलंबरसन टीआर आणि त्रिशा कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका असलेला मणिरत्नम यांचा ‘ठग लाईफ’ हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल निराशा व्यक्त केली आहे, ज्यामुळे त्याला फारसा फायदा होताना दिसत नाही.
अक्षय कुमारने चक्क स्वतः थिएटरबाहेर चेहरा लपवून जाणून घेतला Housefull 5 चा रिव्ह्यू; Video Viral
‘हाऊसफुल ५’ ची कमाई
‘हाऊसफुल ५’ ने भारतात पहिल्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले, तर जगभरात त्याचे कलेक्शन ४० कोटी रुपये होते. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सुमारे ३० कोटी रुपये कमाई केली, ज्यामुळे आतापर्यंतची एकूण कमाई सुमारे ५४ कोटी रुपये झाली. चित्रपटाची सरासरी ऑक्युपन्सी ३३.१८% होती आणि दिवस उलटत चालला होता, चित्रपटगृहांमधील गर्दी वाढत गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चेन्नईसारख्या शहरातही ५२% जागा भरल्या होत्या, इथे देखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Dipika Kakar ने हॉस्पिटलच्या बेडवर साजरी केली ईद, शोएब इब्राहिमने शेअर केली झलक!
‘Thug Life’ चित्रपटाची कमाई
शुक्रवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आता ठग लाईफच्या कलेक्शनमध्ये काही स्थिरता दिसून येत आहे. ट्रेड वेबसाइटनुसार, मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹१५.५ कोटी कमावले होते, परंतु शुक्रवारी ते ₹७.१५ कोटींवर आले, म्हणजेच सुमारे ५४% ची घसरण झाली. शनिवारी, चित्रपटाने सुमारे ₹५.८४ कोटी कमावले, ज्यामुळे भारतात आतापर्यंतची एकूण कमाई सुमारे ₹२८.४९ कोटी झाली. चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीची सरासरी ऑक्युपन्सी ३५.६२% होती.
‘हाऊसफुल ५ ए’ आणि ‘हाऊसफुल ५ बी’ नक्की काय प्रकरण?
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचे मार्केटिंग दोन वेगवेगळ्या क्लायमॅक्ससह करण्यात आले आहे म्हणजेच शेवट हाऊसफुल ५ ए आणि हाऊसफुल ५ बी. ही रणनीती प्रेक्षकांना आवडली आहे आणि चित्रपटासाठी फायदेशीर ठरत आहे. दोन्ही शेवटच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना दिग्दर्शक तरुण यांनी एएनआयला सांगितले की हे करणे कठीण काम होते. ते म्हणाले, “साजिद सरांना ही कल्पना सुमारे ३० वर्षांपूर्वी सुचली होती आणि आता त्यांनी ती हाऊसफुल ५ मध्ये वापरली आहे. दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी एकाच चित्रपटाचे दोन वेगवेगळे क्लायमॅक्स बनवणे हा एक उत्तम अनुभव होता.” असे ते म्हणाले आहे.