(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
रणवीर इलाहाबादियाने समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोमध्ये पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर अनेक सेलिब्रिटी आपले मत व्यक्त करत आहेत. या संदर्भात, इम्तियाज अली यांनीही त्यांच्या चुका गांभीर्याने घेऊ नका असे म्हटले आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच दिग्दर्शक इम्तियाज अली असे का म्हणाले हे आपण आता जाणून घेणार आहोत.
यश खूप लवकर मिळते पण….
इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना, इम्तियाज अली आणि मनोज बाजपेयी यांनी रणवीर इलाहाबादिया वादावर प्रतिक्रिया दिली, ‘ज्यामध्ये मनोज म्हणाले की हे सर्व करून तुम्हाला खूप लवकर यश मिळते, परंतु ते टिकवून ठेवण्यासाठी, आपल्याला असे प्रयत्न करावे लागतील की तुम्ही त्या यशाचा आनंद घेऊ शकाल. सर्व तरुणांनी बाहेरच वातावरण लक्षात घेऊन गोष्टी कराव्यात.’ असे त्यांनी म्हंटले आहे.
लोक Immature असतात, त्यांच्या चुका…
इम्तियाज अली म्हणाले की, ‘तो अजून मॅच्युअर झालेला नाही. आपण त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.’ यशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, जे काही अगदी सहजतेने मिळवले जाते ते जास्त काळ टिकत नाही.’ असे त्यांनी सांगितले आहे. दिग्दर्शक इम्तियाजनेही मनोज वाजपेयींच्या विचारांना पाठिंबा दिला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रणवीर अलाहबादियाच्या अडचणींमध्ये वाढ, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष!
वाद कशावरून सुरु झाला?
स्टँड-अप कॉमेडियन समय रैना ‘इंडिया गॉट टॅलेंट’ नावाचा एक शो चालवतो आहे. या शोमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित केले जाते, ते स्पर्धकांचे परीक्षण करतात आणि त्यांच्यावर भाष्य देखील करतात. अलीकडेच, समय रैनाच्या शोमध्ये जज म्हणून आलेल्या युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने एक वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केली. यानंतर, सोशल मीडियावर लोक त्याच्याविरुद्ध बोलू लागले. पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. रणवीर इलाहाबादियाच्या शोमधील आक्षेपार्ह टिप्पणीमुळे वाद वाढला होता, ज्यासाठी रणवीरने सोमवारी जाहीरपणे आपली चूक मान्य केली आहे आणि माफी मागितली आहे.