फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : बिग बॉसच्या घरामध्ये असलेले स्पर्धक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. आता घरामध्ये 3 वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी बिग बॉस 18 मध्ये प्रवेश केला आहे. मागील आठवड्यामध्ये जेव्हा नॉमिनेट सदस्य झाले होते तेव्हा वोटिंगमध्ये करणवीर मेहरा पहिल्या स्थानावर होता तर दिग्विजय राठी दुसऱ्या स्थानावर होता. मागील आठवड्यामध्ये टास्क जिंकून रजत दलाल घराचा नवा टाइम गॉड झाला आहे. कालच्या भागामध्ये त्याला बिग बॉसने नॉमिनेशनची पॉवर दिली होती. यामध्ये सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये करणवीर मेहरा, कशिश कपूर, विवियन डिसेना, दिग्विजय राठी, अविनाश मिश्रा, चाहत पांडे आणि एलिस कौशिक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
आता या आठवड्याचा लोकप्रियता तक्ताही व्हायरल होऊ लागला आहे. घराचा टाइम गॉड रजत दलाल 14 स्पर्धकांमध्ये पुन्हा आघाडीवर आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक दिग्विजय राठी आणि कशिश कपूर हे देखील टॉप 5 च्या यादीत आहेत. ही यादी पाहून लोक अंदाज लावत आहेत की फिनालेमध्ये टॉप 3 कोण असणार आहेत. रजत दलाल बिग बॉस शोमध्ये प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रजत दलाल आणि करणवीर मेहरा यांच्यात तगडी स्पर्धा असल्याचं दिसत आहे. बिग बॉस पर्यंत हँडल X च्या मतदानाचे निकाल सामायिक केले गेले आहेत. यामध्ये सहाव्या आठवड्याचे नवीनतम रँकिंग दिले आहे. लोकांचा अंदाज आहे की फिनालेपर्यंत रजत दलाल, करणवीर, विवियन, कशिश आणि चाहत पांडे टॉप 5 मध्ये असू शकतात.
1. रजत दलाल – 3,995
२. करणवीर मेहरा – ३,५९८
3. व्हिव्हियन डिसेना- 3,083
4. दिग्विजय राठी – 2,450
5. कशिश कपूर – 1,835
6. चाहत पांडे – 1,550
7. अविनाश मिश्रा – 1,243
8. चुम दरंग – 1,176
9. ईशा सिंग – 535
10. श्रुतिका अर्जुन – 527
11. ॲलिस कौशिक – 369
12. सारा अरफीन खान – 361
13. तेजिंदर बग्गा – 157
14. शिल्पा शिरोडकर – 92
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक आदिन रोज, यामिनी मल्होत्रा आणि अदिती मिस्त्री यांची एंट्री दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांनी या तिघांची एंट्री खास स्टाइलमध्ये केली आहे, ज्याला पाहून घरातील सदस्यही चक्रावले आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये आणखी वेगळी नाती तयार करणार आहेत. त्याच्या कालच्या भागामध्ये रजत दलाल आणि करणवीर मेहरा यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला.
Hasi khushi se kiya gharwalon ne teeno wild cards ka swagat. Dikhe gharwalon ke naye roop, right from Karan to Rajat. 😍
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par.#BB18 #BiggBoss18onJioCinema #WildCardsKaTaandavOnJC #BiggBoss @BeingSalmanKhan #AditiMistry #EdinRose pic.twitter.com/QyZvbpMJB1
— JioCinema (@JioCinema) November 19, 2024
त्याचबरोबर नॉमिनेशमध्ये शिल्पा शिरोडकरने तिच्याच मित्राला करणवीर मेहरा नॉमिनेट केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा बाचाबाची झाली होती. त्यामुळे त्याच्या या मैत्रीमध्ये तडा जाणार की नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल.