(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणीप्रकरणी इतर अनेक स्टार्सचीही चौकशी सुरू आहे. आता महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री राखी सावंतला समन्स बजावले आहे. राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने २७ फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. आता अभिनेत्री हजेर राहील की नाही हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.
Saira Banu: ए.आर. रहमानच्या एक्स पत्नीने का केली सर्जरी? सायरा बानूच्या प्रकृतीबाबत समोर आले उपडेट!
समय रैनाने १७ मार्चपर्यंतचा वेळ मागितला
महाराष्ट्र सायबर सेलने आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहाबादिया यांना २४ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. त्याच वेळी, विनोदी कलाकार समय रैनाने १७ मार्चपर्यंत वेळ मागितला होता. तथापि, महाराष्ट्र सायबरने समय रैनाला १७ मार्चपर्यंत वेळ देण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्र सायबरचे आयजी यशस्वी यादव यांनी ही माहिती दिली.
राखी सावंतने समयच्या शोमध्ये भाग घेतला होता
राखी सावंतने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोच्या एका भागात जज म्हणूनही भाग घेतला आहे. राखी सावंतसोबतचा एपिसोड खूपच व्हायरल झाला. त्याचे छोटे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रणवीर अलाहाबादियाने समयच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर निर्माण झालेल्या वादानंतर रैनाला ट्रोल करण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा राखीने समयला पाठिंबा दिला होता.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमधील वादग्रस्त टिप्पण्यांमुळे विनोदी कलाकार समय रैना आणि युट्यूबर रणवीर अलाहबादिया वादात सापडले आहेत. रणवीर इलाहाबादियाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी लोकांची माफी मागितली आहे. समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व शो काढून टाकल्याची घोषणा केली आहे. कोणत्याही तपासात ते पूर्ण सहकार्य करतील असे समय रैना यांनी म्हटले आहे.