
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘पूर्णा आजी’च्या आठवणीत ‘सायली’ भावूक
जुई गडकरी आणि ज्योती चांदेकर यांची पहिली भेट २०१० मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ मालिकेच्या सेटवर झाली होती. परंतु या दोघींमधील घट्ट नातं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर झालं. जुईसाठी ज्योती चांदेकर या फक्त सहकलाकार नव्हत्या, तर त्या तिची‘आजी’च होत्या. जुई गडकरी त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि आता त्यांच्या अचानक जाण्याने जास्त त्रास जुईला होत आहे.
जुईने सोशल मीडियावर एक खूपच भावुक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, “शो मस्ट गो ऑन… किती सहज म्हणतात ना हे वाक्य हल्ली! पण खरंच इतकं सोप्पं आहे का ते? इतकं सहज मूव्ह ऑन करणं?” आपल्या ‘पूर्णा आजी’ची आठवण काढताना जुईने गोडं व्हिडीओ शेअर केला आहे. ती म्हणाली, “जेवणाच्या टेबलावर आता रोज दुपारी गोड खाण्यावरून भांडण नाही होणार… मृत्यू हेच जीवनाचं एकमेव सत्य आहे, तरीही आपण ते स्वीकारायला तयार नसतो.” असे लिहून जुईने भावुक होऊन ही पोस्ट शेअर केली आहे.
अखेरच्या क्षणापर्यंत लढल्या
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, “ज्योती चांदेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. १० तारखेला त्या मालिकेच्या सेटवरून गेल्या होत्या. ११ तारखेला त्यांनी पुण्यात फिजिओथेरपी घेतली आणि १२ तारखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना संपूर्ण शरीरभर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं.” ४-५ दिवस त्यांनी या आजाराशी झुंज दिली, पण अखेर त्यांच्या जीवाची लढाई थांबली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सहकलाकारांसह त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.